shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वडापूरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची जय्यत तयारी.

वडापूरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाची जय्यत तयारी.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सव यावर्षी दिनांक १४ एप्रिल२०२२ रोजी आयोजित करण्यात आली आली असून याचे आयोजन भिमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्यावतीने करण्यात आली आहे.

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती महोत्सव भिमसेना तरुण व्यायाम मंडळ वडापुरी यांच्या वतीने साजरा करण्यात येत असून दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी ॲड. संभाजी बोरुडे यांचे शाहू फुले आंबेडकर यांचे  विचारावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.  दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच बुद्ध पूजा होणार असून सायंकाळी ६ वाजता महात्मा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे भव्य मिरवणूक होणार आहे. अशी माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली. जयंती महोत्सवानिमित्त वडापुरी गावामध्ये भव्य दिव्य अशी रोषणाई ची सजावट करण्यात आली आहे.
close