shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अहमदनगर जिल्हा महसूल वसुलीत आघाडीवर..! तब्बल१९६ कोटींचा महसूल संकलित..!!


शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
 
जिल्हा प्रशासन :
महसूल विभागाने गेल्या वर्षभरात नगर जिल्ह्यात एकूण १९६ कोटी ७ लाख महसूल गोळा करून सरकारी तिजोरीला हातभार लावला आहे. विभागीय आयुक्तांनी जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत ही वसुली ९३.७३ टक्के आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांनी ही माहिती दिली.

उद्दिष्ट पुर्ती सफल
अहमदनगर जिल्हा महसूल वसुलीत आघाडीवर..! तब्बल१९६ कोटींचा महसूल संकलित..!!

जमीन महसुलाचा ५५ कोटी २९ लाख, तर गौण खनिजाचा १४० कोटी ७८ लाख, असा एकूण १९६ कोटी ७ लाख रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे. नाशिक विभागीय आयुक्तांनी नगर जिल्ह्यात दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत डिसेंबर २०२१ अखेर केवळ ३०.३५ टक्के एवढीच वसुली झाली होती. उर्वरित ३६.३८ टक्के वसुली गेल्या तीन महिन्यांच्या अल्प काळात पूर्ण करण्यात आली. कोरोनाचे संकटामुळे उद्दिष्टपूर्तीचे आव्हान जिल्ह्यातील होते. 


जमीन महसूल, अकृषक कर, तुकडेबंदी, नजराणा, विक्री परवानगी प्रकरणे, मोबाईल टॉवर, तडजोड शुल्क, अंतर्गत लेखापरीक्षण आदी बाबींत जमीन महसूलमध्ये सर्वाधिक म्हणजे १२३.०७ टक्के वसुली झाली. 
महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून दगडखाणी, स्टोन क्रशरधारक यांच्याकडील स्वामित्वधन, ईटीएस मोजणी तफावत, प्रलंबित दंड, वाहन लिलाव, वाळू लिलाव, विविध सरकारी विभागांकडून स्वामित्वधनाच्या रकमा तसेच जिल्ह्यात चालू असलेल्या विविध राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून प्राप्त उद्दिष्टापैकी ११५ कोटी ७२ लाख यांची म्हणजे ८२.२० टक्के इतकी वसुली झाली.
close