shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्जत तहसील कार्यालयात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन..!

कर्जत । प्रतिनिधी(विजय डेरवणकर):-

          राज्यातील महसूल विभागात महसूल सहाय्यकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहे.  एका महसूल सह्हाय्यकाकडे अन्य दोन ते तीन संकलनाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे कर्मचारी प्रचंड तणावात आहेत . महसूल सहाय्यक भरतीसाठी शासनाकडे वारंवार पुरवठा करून देखील भरती करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहेत तसेच अन्य मागण्या देखील मान्य केल्या जात नसल्याने महाराष्ट्र महसूल कर्मचारी संघटनेने सोमवार पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे . यात कर्जत तहसील कार्यालयातील कर्मचारी सहभागी झाले आहेत.

 आठवड्याचा पहिला दिवस सोमवार हा कामाचा दिवस त्यात कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने तालुक्यातून विविध शासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
 अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गातील पदोन्नती चे प्रस्ताव मंत्रालयात दीड ते दोन वर्षापासून प्रलंबित असल्याचे या संघटनेचे म्हणणे आहे. 

शासन निर्णय महसूल व वन विभाग दिनांक 10 मे 2019 नायब तहसीलदार संवर्ग म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. त्यानुसार सर्व अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांच्या सेवा जेष्ठता याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याबाबत शासनाने पत्र काढलेले आहे परंतु अव्वल कारकून व मंडळ अधिकारी आज जिल्हास्तरीय संवर्ग असल्यामुळे त्यांच्या याद्या राज्यस्तरावर एकत्रित करण्याची प्रक्रिया ही अन्यायकारक असल्याचे असल्याने सदर पत्र तात्काळ रद्द करण्यात यावे.आदी मागण्या महसूल कर्मचारी संघटनेने शासनाकडे केल्या आहेत.

    वैभव जाधव,मनोहर वाघ,नितीन घुर्ग,विलास पाडवी ,रंगनाथ सरोदे, चंद्रकांत वाघमारे,दिपक राठोड आदी कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

---------------------------
close