भगवान श्रीहनुमानजी श्रीरामाचे परम भक्त होते.श्री हनुमानजींनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची अखंड आणि निस्वार्थ सेवा केली. ही सेवा अशी आहे की त्यांच्याशिवाय या भुतलावर आजपर्यंत कोणीही अशी सेवा केलेली आढळत नाही. अशी सेवा अखंड भुतलावरील मानवजातीसमोर एक आदर्शवत अशी सेवा आहे. यामुळेच मानवजातीमध्ये सेवा करण्याची पध्दत दृढ झाली.
श्री हनुमानजी हे साक्षात भगवान शंकराचा अवतार होय. ब्रम्हा विष्णू आणि महेश हे एकमेकांची वेगवेगळ्या अवतारात सेवा केलेली आपल्याला अनेक ग्रंथांत दिसून येते.श्री हनुमानजी यांची शक्ती अफाट होती हे आपल्या सर्वांना माहितच आहे, रामायण काळातही हनुमानजींनी आपली शक्ती सर्वोच्च पातळीवर कधीच नेली नाही कारण असे झाले असते तर लंका काही क्षणातच नष्ट झाली असती. हनुमानजींना अमरत्वाचे वरदान मिळाले होते आणि ते कलियुगाच्या शेवटपर्यंत पृथ्वीवर राहतील असे वरदान आहे.
श्रीहनुमान जी यांच्या सारखी सेवा करण्याची प्रत्येक गावात वृत्ती असावी यासाठी हनुमान मंदिरांची प्रत्येक गावात उभारणी करण्यात आल्याचे आढळून येते. श्रीहनुमानजी जिवंत असल्याचा पुरावा आज देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो, रामायणानंतर हनुमानजी कुठे गेले..? हा प्रश्न आपल्या सर्वांनाच पडला असेल पण ते आजही या ठिकाणी आहेत. हेच अंतिम सत्य आहे कारण ते चिरंजीव आहेत.
रामायणात असेही सांगण्यात आले आहे की, भगवान श्रीराम पृथ्वी सोडून जाईपर्यंत श्रीहनुमानजी अयोध्येत त्यांची सेवा करत राहिले.आणि त्यानंतर त्यांनी जंगलाला आपले निवासस्थान बनवले, त्यानंतर त्रेतायुग संपला आणि द्वापर युग सुरू झाला. द्वापर युगात हनुमानजींचा उल्लेख दोनदा करण्यात आला आहे, पहिल्यांदा भीम जंगलात असताना त्याला एक म्हातारा वानर सापडला, म्हणाला मी उठणार नाही, तूच मला या मार्गातून दूर कर, यानंतर गर्विष्ठ झालेल्या भीमाने सर्वतोपरी प्रयत्न केले.पण त्याला त्या माकडाची शेपटीही हलवता आली नाही, तेव्हा भीमाला समजले की तो सामान्य वानर नसून स्वतः हनुमान आहे. जो भीमाला अभिमान सोडण्याचा धडा द्यायला आला होता.
यानंतरही संपूर्ण महाभारत युद्धात श्रीहनुमानजी अर्जुनासोबत रथावर ध्वजाच्या रूपात राहिले होते. शेवटी हनुमानजी त्यांच्या मूळ रूपात आले आणि तेथून निघून गेले तेव्हा तो रथही भ’स्मसात झाला.
अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले असता श्रीकृष्णाने सांगितले की, ते श्रीहनुमानजी होते, त्यामुळे त्यांच्या रथाला काहीही झाले नाही, नाहीतर इतक्या वि’ध्वंसक अ’स्त्रांसमोर अर्जुनाचा रथ कधीच उभा राहू शकला नसता. अशा प्रकारे महाभारत काळात हनुमानजींचीही नोंद झाली. कलियुगात देखील हनुमानजींच्या कथा ऐकायला मिळतात.
इंडोनेशिया कंबोडियामध्येही वेगवेगळ्या नावाने हनुमानजींच्या कथा ऐकायला मिळतील. मित्रांनो, आफ्रिकेपासून ते अमेरिकेपर्यंत आजही बलाढ्य वानर जि’वंत असल्याची चर्चा आहे. १४ व्या शतकात, 'ऋषी मध्वाचार्य" यांनी हनुमानजींना भेटल्याबद्दल सांगितले. १३ व्या शतकात तुलसीदासजींनी देखील सांगितले की, हनुमानजींनी त्यांना "रामचरितमानस" लिहिण्यासाठी प्रेरित केले होते.त्यानंतरही अनेक ऋषींनी हनुमानजींना भेटल्याचा किंवा पाहिल्याचा दावा केला. जगभरात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे अशा पावलांचे ठसे बनवले जातात, जे पाहिल्यानंतर असे समजते की, असा एक जीव आहे ज्याचा आकार खूप मोठा आहे, जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये हे पायांचे ठसे सापडले आहेत. शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की,ही खूण अशाच काही प्राण्याचे आहे, ज्यांचे शरीर खूप मोठे असावे, असे म्हटले जाते की, जेव्हा भगवान श्रीरामाने आपले मानवी शरीर सोडले तेव्हा हनुमान अयोध्या सोडून श्रीलंकेच्या जंगलात रामाच्या स्मरणार्थ पिदारू पर्वतावर गेले. येथील लोकांनी हनुमानजींची खूप सेवा केली, त्यांच्या भक्ती आणि सेवेवर आनंदित होऊन, त्यांनी त्यांना वचन दिले की ते प्रत्येक ४१ वर्षांनी त्यांच्या कुळात राहायला येतील.
तसेच तुम्ही कोणत्याही हनुमान मंदिरात जा तिथे आसपास तुम्हाला सरासरी वानर आढळतील हे नक्की.., श्रद्धेनुसार हेच खरं आहे की भगवान हनुमान आजही आपल्यात आहेत...!
त्यासाठी श्रध्दा ठेवले तर हनुमान जी नक्कीच कल्याण करतील...🙏
माहिती संकलन
हभप सखाराम महाराज जेठे
रा.देहरे, ता.नगर
हनुमान जी भक्तांनो तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक, कमेंट जरूर करा तसेच तुमच्या नातेवाईकांना देखील शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील ही माहिती मिळेल.

