दारूच्या नशेत स्वतःच घेतला डोक्यात तांब्या आणि दारुडा बाप म्हणतो पोराने मारला ठोंब्या..!!
----------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
दारूच्या आहारी गेलेल्या विकृत दारुड्याने चक्क दारू पिऊन घरातील मुला समोर विकृत चाळे करीत घरात धिंगाणा केला. दारूच्या नशेत स्वतःच स्वतःच्या डोक्यात तांब्या मारून घेत डोके फोडुन घेऊन पोलीसात मुलाने डोक्यात लोखंडी ठोंब्या मारून घेतला. मात्र मुलगा शुभम याने जखमी केल्याचा बनाव करीत स्वतःच्या मुलावर खोटी तक्रार दाखल केली.
या बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील संतोष नेमट यास दारू पिण्याचे व्यसन आहे. दि. २१ एप्रिल रोजी संतोष नेमट याने दारू पिऊन घरी गोंधळ घातला. तसेच स्वतःच्या अंगावरचे कपडे काढून तो अर्धनग्न झाला. या बाबत त्याच्या कुटुंबातील लोकांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही आणि दारूच्या नशेत त्याने स्वतःच्या डोक्यात स्वतःच्या हाताने पाणी पिण्याचा तांब्या मारून घेत जखम केली. पोलीस ठाण्यात जाऊन जमिन नावावर करून का देत नाहीस? असे म्हणून त्याच्या मुलाने डोक्यात लोखंडी ठोंब्या मारल्याचा बनाव केला. तशी खोटी माहिती देत मुलाच्या विरुद्ध तक्रार दिली; पण नंतर पोलीसांनी याची चौकशी केली असता सदर व्यक्ती हा दारुडा असून त्याने स्वतःला मारून घेऊन जखमी करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्याचा एक विकृत व्हिडीओ देखील हाती लागला असून तो त्याच्या कुटुंबियांना त्रास देत आहे.
संतोष नेमट व शोभा नेमट हे नात्याने नवरा बायको आहेत. संतोष याने त्याची पत्नी शोभाहिस दारू पिण्यास पैसे मागितले. त्यावर त्याला शोभा म्हणाली की, माझ्याकडे पैसे नाहीत. असे म्हणताच संतोषने त्याची पत्नी शोभा हिच्या हातावर बुक्या मारून बांगडया फोडल्या. तसेच तोंडावर चापटा मारीत असतांना त्यांची मुलगी भांडण सोडवण्यास आली असता तिला पण शिवीगाळ करून चापटाबुक्याने लाथाने मारहाण केली. त्याच बरोबर शोभा हिला म्हणाला की, जर तुझ्या भावास व आईस सांगितलेस; तर तुला फाशी देवून मारून टाकीन. अशी धमकी दिली. ओळखीचा गैरफायदा घेवून गळयातील मनी मंगळसुत्र बळजबरीने हिसकून घेवून गेला.
शोभा नेमट यांच्या तक्रारी वरून दि. २३ एप्रिल रोजी केज पोलीस ठाण्यात संतोष नेमट याच्या विरुद्ध गु. र. नं. १३४/२०२२ भा. दं. वि. ३२७, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अशोक गवळी हे पुढील तपास करीत आहेत.

