"शिवराज्य शेतकरी विकास मंच"च्या वतीने
इंदापूरात शुक्रवारी रोजा इफ्तार पार्टी संपन्न ..!
इंदापूर (प्रतिनिधी): - सर्वधर्मिय जातीय सलोखा जोपासला जावा, समाजा-समाजामध्ये एकता आणि सामाजिक सलोख्याचा विश्वास अधिक दृढ व्हावा या उद्देशाने येथील"शिवराज्य शेतकरी विकास मंच"च्यावतीने इंदापूर शहरात "कसबा" या ठिकाणी शुक्रवारी शहरातील सर्व हिंदू - मुस्लीम बांधवांना इफ्तार
पार्टीचे आयोजन करण्यात आले होते,या इफ्तार पार्टीमध्ये सर्वांना सस्नेह भोजन देण्यात आले.
"शिवराज्य शेतकरी विकास मंच" ने आयोजित केलेल्या या इफ्तार पार्टीमध्ये इंदापूर शहरातील अनेक नागरिकांनी यावेळी भोजनाचा आस्वाद घेतला,
"शिवराज्य शेतकरी विकास मंच" हा सर्व गोर-गरीब व सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणारा पक्ष असल्याचेही यावेळी प्रदेशाध्यक्ष जावेदभाई शेख म्हणाले, यावेळी शहरातील दर्गा मस्जिदचे मौलाना, व्यंकटेशनगरचे मौलाना तसेच शहरातील प्रतिष्ठित/नामवंत नागरिक, त्याचप्रमाणे शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी "शिवराज्य शेतकरी विकास मंच"चे प्रदेशाध्यक्ष पत्रकार जावेदभाई शेख, प्रदेश कार्याध्यक्ष वैभव सोनवणे, इंदापूर तालुका अध्यक्ष गुणवंत दळवी तसेच पुणे जिल्हा सदस्य किशोर मिसाळ, सोहेल तांबोळी,अली अकबर मनेरी,अफजल कुरेशी,युनुस मनेरी,तथा इतर सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

