shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आजच्या तरुणाईने महापुरुषांच्या जयंत्या अन् पुण्यतिथ्या या नाचून नव्हे तर वाचून साजऱ्या कराव्यात-डॉ. प्रकाश पांढरमिसे"

"आजच्या तरुणाईने महापुरुषांच्या जयंत्या अन् पुण्यतिथ्या या नाचून नव्हे तर वाचून साजऱ्या कराव्यात-डॉ. प्रकाश पांढरमिसे"
इंदापूर प्रतिनिधी:श्री शिवाजी एडज्यूकेशन सोसायटीचे,श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील  महाविद्यालय, बावडा, इतिहास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.11 एप्रिल रोजी महाविद्यालयात क्रांतिसूर्य म.फुले यांच्या 195व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.  
      .या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे  इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पांढरमिसे यांनी " स्त्री शिक्षणाचे प्रणेते- महात्मा फुले " या विषयी बोलताना ते म्हणाले कि, भारतातीलच नव्हे तर पाश्चात्य देशातील विद्यापीठांमध्ये म.फुलेंचे विचार अभ्यासले जात आहेत. हे भारतासाठी व आपल्या सर्वांसाठी सार्थ अभिमान आणि गौरवाची बाब आहे.म. फुले यांनी ब्रिटिशकाळात इ.स 1848 साली पुण्यात मुलींची काढलेली पाहिली शाळा ही महाराष्ट्रातील संबंध महिला वर्गासाठी समजपरिवर्तनाची क्रांतिकारी नांदी होती. म. फुले गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राम्हणांची कसब, तृतीय रत्न, शेतकऱ्यांचा आसूड हे तत्कालीन परिस्थितीवर परिवर्तन आणण्यासाठी लिहलेले साहित्य ज्याने प्रबोधनाबरोबरच परिवर्त आणले.आजच्या तरुणाईने अशा महापुरुषांच्या जयंत्या व पुण्यतिथ्या या केवळ नाचून साजऱ्या करण्या ऐवजी वाचून साजऱ्या करायला हव्यात. तरच त्यांनी सांगितलेले आदर्श विचार, संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहचतील.असे मत व्यक्त केले.
  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लहू वावरे होते. त्यांनी तरुणाईला महापुरुषांनी घालून दिलेले मार्गाने मार्गक्रमण करताना. स्वतःची  ओळख कर्तृत्वाने व कर्तबगारीने कुटुंब, समाज, कॉलेज आणि महाविद्यालयात निर्माण केली पाहिजे. असे मत व्यक्त केले.
       शैलेश गवळी याने विध्यार्थी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. शुभांगी दडस हिने केले. आभार अक्षय शिंदे याने मानले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. सोनम पवार यांनी केले. यावेळी उपस्थित प्राध्यापक, प्रध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने विध्यार्थी उपस्थित होते सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.
close