shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वालचंदनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार... राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

वालचंदनगर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यान सुशोभीकरण व विकसित करण्यासाठी १० कोटी तातडीने मंजूर करणार... राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

ना. दत्तात्रय भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून उपस्थित आंबेडकरप्रेमी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

इंदापूर प्रतिनिधी:विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथील जयंती कार्यक्रमाप्रसंगी राज्यमंत्री नामदार  दत्तात्रय  भरणे यांची उपस्थितांना  जाहिर ग्वाही दिली.ना. दत्तात्रय भरणे  यांच्या प्रयत्नांतून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याने वालचंदनगर परिसरातील नागरिकांनी  ना. भरणे  यांचे जाहीर आभार मानले.
विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिमेस राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  दत्तात्रय भरणे यांनी पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून उपस्थित आंबेडकरप्रेमी जनतेला जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ना. दत्तात्रय भरणे यांनी माझ्यासारख्या शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या कार्यकर्त्याच्या राजकीय, सामाजिक जीवनात नेहमीच वालचंदनगरवासीय व येथील आंबेडकरप्रेमी जनता सदैव पाठीशी खंबीरपणे उभी रहात आल्याने माझ्यासारख्याला विविध पदे भुषवता आली व सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे सांगून देशभरासह जगातील कोट्यावधी जनतेचे श्रध्दास्थान व प्रेरणास्थान असलेले विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व भव्य जागा उपलब्ध असणारे वालचंदनगर येथील बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे इंदापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण असून अशा सुंदर उद्यानाच्या सुशोभीकरण व विकासाकरीता तातडीने १० कोटी रूपयांचा विकास आराखडा तयार करून तो तत्परतेने मंजूर करणार असल्याची जाहिर ग्वाही नामदार  भरणे  यांनी उपस्थितांना दिली.
तसेच १० कोटी रूपयांच्या विकासकामांवर स्वतः लक्ष देऊन उद्यानातील विकासकामे दर्जेदार होण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचेही यावेळी जाहीर करताच उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात नामदार  भरणे  यांच्या घोषणेला प्रतिसाद दिला.

              या कार्यक्रमाच्या प्रसंगी ना. भरणे  यांनी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता ४ कोटी ६० लाख रुपये मंजूर झाल्याचे सांगून सदर कामांना येत्या काही दिवसांत सुरवात होणार असल्याची माहिती ना. भरणे  यांनी दिली.वालचंदनगर परिसरातील दलित वस्तीमधिल विविध विकासकामांकरीता भरघोस निधी मंजूर केल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी नामदार  भरणे  यांचे जाहीर आभार मानले.यावेळी वालचंदनगर इंडस्ट्रीज लिमिटेडचे एम डी ॲन्ड सीईओ  चिरागशेठ दोशी, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  प्रदीद गारटकर, पुणे जिल्हा परिषद सदस्य माजी प्रताप पाटील,फॅक्टरी मॅनेजर  धिरज केसकर,वालचंदनगर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  लातुरे , जिल्हा नियोजन समितीचे सदस्य  सचिन सपकळ, इंदापूर तालूका संजय गांधी निराधार समितीचे  अध्यक्ष  सागर मिसाळ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष  शुभम निंबाळकर यांच्यासह वालचंदनगर परिसरातील आंबेडकरप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close