तेजपृथ्वीग्रुपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.
तेजपृथ्वीग्रुपच्या वतीने शासकीय रुग्णालयात फळे वाटप व विविध अधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे पुस्तक व पेन भेट.
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक १४ एप्रिल २०२२ रोजी इंदापूर नगरपालिकेच्या समोरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
तसेच इंदापूर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात आज तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने रुग्णांना फळे वाटप तसेच जिल्हा रुग्णालय व पोलीस प्रशासकीय अधिकाऱ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तक व पेन भेट देण्यात आले.
यावेळेस तेजपृथ्वी ग्रुपच्या अनिताताई खरात म्हणाल्या की, आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपण ताठमानेने फिरतो. ते नसते तर आपण कोणीच नसतो. आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेमुळे आज मी आपल्यासमोर ताठ मानेने उभी आहे. बाबासाहेबांच्या विचारानेच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आज आम्ही आमच्या तेजपृथ्वी ग्रुप कडून रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व रुग्णालयातील व पोलीस प्रशासकीय अधिकारि व कर्मचारी यांना बाबासाहेबांच्या जीवनावरील पुस्तक व पेन भेट देऊ शकलो.
यावेळेस वैद्यकीय अधिकारी डॉ. खामकर , डॉ. साळुंखे ,नानासाहेब खरात यांनी बाबासाहेबां वरील विचार व्यक्त केले .
या वेळेस पी.एस.आय चौधर , गुप्तहेर खात्याचे पवन भोईटे, पोलीस अधिकारी सलमान खान, उपजिल्हा रुग्णालयाच्या वृषाली निंबाळकर ,आप्पासाहेब माने, तेजपृथ्वीग्रूपचे उपाध्यक्ष गणेश शिंगाडे, प्रसाद पाधे ,रेश्मा शेख संगीता गिरमे ,सचिन सुळ ,रमेश टुले हे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

