shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा जागतिक आदर्श महिला पुरस्कार सुनंदा जाधव यांना प्रदान...!

शिर्डी- मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या संस्थेच्या वतीने जगभरातील विविध क्षेत्रातील धार्मिक,सामाजिक व विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान केला जातो,हा पुरस्कार सोहळा काल(१९)रोजी नाशिक येथील शंकराचार्य डॉ.कुर्तकोटी सभागृहात नुकताच पार पडला.

यावेळी  राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.हा सोहळा डॉ.जयलक्ष्मी सानिपिना राव,पोलीस विभागाचे रमेश आव्हाड,प्रकाश सावंत,मिनाक्षी गवळी,मनिषा कदम,पुनम बिरारी ॲड.कृष्णाजी जगदाळे आदि प्रमुख मान्यवरांचे उपस्थितीत पार पडला.शिर्डी येथील सुनंदा जाधव यांना विविध धार्मिक व सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांना याच संस्थेच्या वतीने यापूर्वी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे,.

सौ,सुनंदा जाधव ह्या गेल्या २५ वर्षांपासून विविध धार्मिक संस्था,अनाथ संस्थेशी जोडल्या गेल्या असून शिर्डी,नाशिक,अहमदनगर,पुणे आदींसह विविध राज्यातील संस्थेशी त्या जोडल्या गेलेल्या आहेत.त्यांनी २०२१ व २०२२ मध्ये केलेल्या विशेष उल्लेखनिय कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी शिर्डी येथील उद्योजक बाळासाहेब जाधव नाशिक येथील ऑल इंडिया रेडिओच्या पत्रकार सीमा पेठकर, माही जाधव आदी उपस्थित होते,सुनंदा जाधव यांचे अन्नपूर्णा मठाधिपती महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरीजी महाराज,सिद्धाश्रमचेस्वामी नित्यानंदगिरीजी महाराज, मा नगरसेवक नितीन शेळके, डॉ संदिप शेळके, अक्षय शेळके, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब नाईकवाडे, रविंद्र सोनवणे आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
close