महेमूद मुलाणी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार
इंदापूर प्रतिनिधी:कुरवली (ता. इंदापूर) येथील मेहमूद उस्मान मुलानी यांना महाराष्ट्र राज्य तंत्रस्नेही शिक्षक समूहाच्या महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने सेवा सन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ जाहीर करण्यात आलेला आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र पुणे जिल्हा निवड समिती सदस्य दायमा सय्यद माजिद यांच्या हस्ते नुकतेच महेमूद मुलाणी यांना देण्यात आले.
मेहमूद मुलाणी हे कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालय, कुरवली (ता. इंदापूर) येथे कार्यरत आहेत. एकूण चोवीस वर्ष माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक स्तरावर अध्यापक म्हणून ते कार्यरत आहेत. विज्ञान आणि गणित हे त्यांचे शिकवण्याचे विषय आहेत.
कोरोना साथीच्या टाळेबंदी लोकडाऊनच्या काळात संपूर्ण शिक्षण व्यवस्था ठप्प झालेली असताना महेमुद मुलानी यांनी युट्युब या माध्यमातून महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना विज्ञान, बौद्धिक क्षमता आणि गणिताचे धडे दिले. मेहमूद मुलानी ऑनलाईन एज्युकेशन या चॅनलचे आता सुमारे १६ हजार पेक्षा अधिक सबस्क्रायबर आणि १ मीलियन पेक्षा जास्त दर्शक आहेत. त्यांच्या विविध विज्ञान प्रकल्पांना तालुका तसेच जिल्हा स्तरावर नावाजले गेलेले आहे. त्यांच्या प्रत्यक्ष तसेच ऑनलाइन मार्गदर्शना च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातुन शेकडो विद्यार्थी NMMS आणि NTS या परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटी बावडा चे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील तसेच संचालक मंडळाच्या वतीने कर्मयोगी शंकरराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश घोरपडे सर यांनी मुलाणी सर यांचे अभिनंदन केले आहे.

