shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

समर्थ नगर वकिलवाडी केज येथे भीम जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन..!!


--------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी विश्वावंदनिय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची संयुक्त जयंती केज येथील समर्थ नगर येथर शहीद रामदास कदम प्रतिष्ठानच्या वतीने साजरी करण्यात येत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजित केल्या असल्याची माहिती उत्सव समितीच्या वतीने देण्यात आली आहे.


दि. ११ एप्रिल सोमवार रोजी सायंकाळी ७:०० वा. महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका आणि भीमराज की बेटी फेम पंचशिलाताई भालेराव यांच्या सुश्राव्य संगीतमय भिम गीतांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. याचे उदघाटन जेष्ठ भाजपा नेते रमेश आडसकर यांच्या हस्ते आणि अंकुश इंगळे यांच्या अध्यक्षतेखा तसेच जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, नगराध्यक्षा सिताताई बनसोड, हारूनभाई इनामदार, आदित्य पाटील, भाई मोहन गुंड, दीपक कांबळे आणि रत्नाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.


दि. १२ एप्रिल मंगळवार रोजी सायंकाळी ७:०० स्थानिक कलावंतांचा संगीत रजनी आणि त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

त्याचे उदघाटन जनविकास परिवर्तन आघाडीचे नगरसेवक हारुणभाई इनामदार यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. आ. पृथ्वीराज साठे, नगराध्यक्षा सौ. सिताताई बनसोड, रणजितसिंह पाटील, जिल्हा परिषद सदस्य विजयकांत मुंडे, पशूपतीनाथ दांगट, नगरसेवक शकुंतला अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.


दि. १३ एप्रिल बुधवार रोजी सकाळी ६:०० वा. छत्रपती शिवाजी चौक ते शारदा इंग्लिश स्कुल आणि परत छत्रपती शिवाजी चौक या दरम्यान भव्य अशी खुल्या धावण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उदघाटन सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत साहेब यांच्या हस्ते आणि स्वतः ते या स्पर्धेत भाग घेऊन करणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार दुलाजी मेंडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले सर, आदर्श पत्रकार संघ, पुरोगामी पत्रकार संघ, सक्रीय पत्रकार संघ झुंजार पत्रकार संघ सर्व भिमजन्मोत्सव समित्या आणि रोटरी कल्ब केज यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.


दि. १४ एप्रिल गुरुवार रोजी मुख्य ध्वजारोहण आणि त्याच बरोबर बक्षिस वितरणाचा कार्यक्रम जेष्ठ विधिज्ञ आणि जेष्ठ नेते राजेसाहेब (पापा) देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि सुरेश तात्या पाटील, रिपाइंचे जेष्ठ नेते संदीपान हजारे, रमाकांत मुंडे, किसनदादा कदम, नगरसेवक भाऊसाहेब गुंड, अमर पाटील राजू इनामदार, निलेश साखरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

तरी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जयंती उत्सव समितीच्या वतीने प्रा. संजय कोरडे, मयूर अंधारे व सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अशोक सोनवणे, विजय आरकडे, शिवाजी हजारें.कविराज गायकवाड , प्रकाश मुंडे,विजय वनवे, राज शिंदे ,राहुल सरवदे,पोपट बनसोडे , मनोज शिंदे , विजय अंडील ,शिवाजी घुले व उत्सव समितीचे कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.
close