shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नागरिकांच्या सहकार्याने हिवताप दुरीकरण शक्य..प्राचार्य.डॉ.डवले.

सोनई :- "येता कणकण तापाची,करा तपासणी रक्ताची"* कोणताही ताप हिवताप असू शकतो.हिवताप हा आजार कीटकजन्य आजार असून हा आजार वेळीच उपचारा अभावी जीवघेणा ठरू शकतो.हिवतापा सोबतच हत्तीरोग, डेंगी,चिकुनगुनिया,चंडिपुरा व जे.ई सारख्या रोगाचा प्रसार डासामार्फत होतो.कीटकजन्य आराजाराला आळा घालण्यासाठी डासांच्या उत्पतीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

        आज 25 एप्रिल जागतिक हिवताप दिनी आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती व जिल्हा हिवताप कार्यालय अमरावती अमरावती यांच्या वतीने हिवताप व अन्य कीटकजन्य आजाराबाबत जनजागृती म्हूणन पूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली.
     हिवताप कार्यालयाच्या प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्रीमती.मंजुषा देशपांडे,श्रीमती.निवेदिता झटाले,श्रीमती.वर्षा कांबळे व श्रीमती.केचे यांनी कीटकजन्य आजाराचे लक्षणे व उपचार या बाबत रांगोळीच्या माध्यमातून निर्जीव चित्रात जीव टाकून बोलका संदेश दिला.आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथे कीटकजन्य आजाराविषयी निबंध स्पर्धेचे व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करून आजाराबाबत जनजागृती म्हूणन नाट्यमय उपक्रम राबवून जनजागृती करण्यात आली.

        जागतिक हिवताप दिनाचे या वर्षीचे घोषवाक्य "काहीतरी नविन करूया,हिवताप रोगाचा भार कमी करून जीव वाचवूया " हे असून या घोषवाक्यानुसार आपल्या अमरावती जिल्ह्यात कीटकजन्य आजाराला आळा घालवण्यासाठी आपण सर्वांनी जनतेच्या सहकार्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून अनमोल जीवनाचे रक्षण कसे करू शकतो.तसेच कीटकजन्य आजाराची लक्षणे,उपचार व आजार झाल्यावर घ्यायची काळजी या बाबत सविस्तर मार्गदर्शन मा.प्राचार्य, डॉ.डवले सर आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र व मा.जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.जोगी सर तसेच हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांनी केले.

          हिवताप आजाराबाबत जनजागृती म्हूणन घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक श्री.रामलू मडावी व दुसरा क्रमांक श्री.शरद रायबोले व तिसरा क्रमांक श्री.सागर इंगोले यांचा आला मा.प्राचार्य सर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.मा.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नरवणे सर यांनी रांगोळीच्या प्रदर्शनाची पाहणी करून स्तुती केली.तसेच मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रणमले सर व अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती.साबळे मॅडम यांनी रॅली मध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

       वरील कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.बनसोड सर अवैद्यकीय अधिकारी डॉ.मुंद्रे सर,प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी श्री.वावरे सर,पर्यवेक्षक श्री.डोंगरे सर व सातपुते सर,श्री.लुंगे सर,श्री.मदने सर,श्री.चोपकर सर,श्री.तराळ सर,दातीर सर,कोल्हे सर,श्री.जैस्वाल सर,श्री.नांदणे व आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती येथील बॅच क्रमांक 28 चे सर्व प्रशिक्षण घेणारे कर्मचारी उपस्थित होते.
close