shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्माची कास धरा - दत्ता श्रीखंडे

तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्माची कास धरा - दत्ता श्रीखंडे 

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि २५-४-२०२२

अध्यात्मात मोठी ताकद असून  तरुणांनी व्यसनाच्या आहारी न जाता अध्यात्माची कास धरून प्रगती साधावी असे आवाहन पुणे येथील  मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे समन्वयक दत्ता श्रीखंडे यांनी केले.

राहुरी तालुक्यातील तांभेरे रोड येथील मयुरेश्वर फार्म येथे मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र व राहुरी फॅक्टरी येथील प्रजापती ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनजागृती अभियान कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर लोणी येथील ओम शांती केंद्राच्या आशा दीदी, राहुरी फॅक्टरी ओम शांती केंद्राच्या ज्योती दीदी,कौन्सिलर अमोल पोटे, नितीनजी देऊसकर, अजित येवले उपस्थित होते.

पुढे बोलताना श्रीखंडे म्हणाले की,व्यसनाच्या आहारी गेलेला माणूस हा तण, मन आणि धनाने संपुष्टात जातो. व्यसनमुक्तीच्या माध्यमातून राज्यभरात काम करत असताना तरुण पिढी व्यसना पासून कशी मुक्त होईल यादृष्टीने नक्कीच मनापासून प्रयत्न चालू आहे.

यावेळी डॉ.तुंबारे,डॉ.महानंद माने, डॉ.संदीप कोळसे, शाखा अभियंता रवींद्र ठाकूर, डॉ.खामकर,मच्छीन्द्र कराळे, मच्छीन्द्र पवार बाळासाहेब भांड आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अविनाथ ठाकूर व ओम शांती परिवार राहुरी फॅक्टरी आदींनी परिश्रम घेतले.
close