shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मंत्री गडाख यांच्या पी ए वर गोळीबार प्रकणातील एका आरोपीला शेवगावातुन स्थानिक गुन्हा शाखेकडुन अटक..!

प्रतिनिधी । मोहन शेगर, 
सोनई :-राज्याचे जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांच्या स्वीयसहायकावर गेल्या शुक्रवारी लोहगाव येथे गोळीबार करण्यात आला होता आणि यात चार जनाचा सहभाग होता तशी फिर्याद विकास राजळे यांनी सोन‌ई पोलीस ठाण्यात दिली आहे  पोलीस अधीक्षक मनोज पाटील,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चार पथके तयार करुन आरोपीच्या शोधासाठी पाठविलें होतेे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार या चार पैकी एका आरोपीला स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी शेवगाव परिसरातुन अटक केली आहेे. 

नितीन शिरसाठ असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. मंत्री शंकरराव गडाख याचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर शुक्रवारी रात्री दहाच्या दरम्यान लोहगाव परिसरात गोळीबार करून राजळे यांना जख्मी केले होते. आरोपी नितीन शिरसाठ हा शेवगाव परिसरात लपलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी त्याला शेवगाव परिसरातुन अटक करण्यात आली आहे. बबलु लोंढे, संतोष भिगारदिवे व ऋषीकेश शेटे अजुनही फरार आहेत.

close