shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रुईछत्तीसी येथील भैरवाडी शेतकर्यांचे स्वतंत्र विजरोहित्राचे लोकार्पण..!!

नगर‌‌ प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के)
(दि.२५)नगर तालुक्यातील  रूईछत्तीसी येथील भैरवाडी येथील शेतकरयांची अनेक दिवसांपासून स्वतंत्र  विजरोहित्रची बसविण्याची मागणी होती. या भागात स्वतंत्र विजरोहित्राचे नसल्याने शेती साठी पाणी देण्याचे हे खुप कसोटीचे काम झाले होते. त्यात अलिकडेच भारनियमन कमी दाबाने वीज पुरवठा  आशा अनेक समस्या या भागातील  शेतकऱ्यांना एकाच विज रोहित्रावरुन पुरवठा होत  असल्याने शेती पंप चालत नव्हते. ‌जनावराना पिण्याचे पाणी भरण्यासाठी मोठी समस्या होती.


त्यामुळे या मागणीची दखल  जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ व माजी उपसभापती रविंद्र भापकर यांनी तत्परतेने सर्व सविस्तर माहितीनिशी  नगर श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते व महाराष्ट्र राज्यांचे उर्जा मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या कडे शेतकरयांना  समस्या सोडविण्यासाठी  स्वतंत्र विज रोहित्राची आवश्यकता आहे. 

व ते लवकर लवकर मिळवण्यासाठी योग्य तो पाठपुराव्यामुळे आज प्रत्यक्षात महावितरण कंपनीचे अधिकृत ठेकेदार मार्फत शेतकरयाच्या शेतात विजरोहित्र बसवण्यात आले. या ठिकाणी आज विजरोहित्राचे या भागातील शेतकऱ्यां समवेत जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकअर्पण करण्यात आले. 

या वेळी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, माजी उपसभापती रविंद्र भापकर, ग्रा.सदस्य प्रविण गोरे,मोहन गोरे, रुपचंद गोरे,नाना गोरे,भाऊ गोरे,विशाल गोरे,आण्णा गोरे, दौलत गोरे, हरिदास गोरे, बजरंग पाडळकर,प्रभाकर गोरे, सोमनाथ गोरे, अनिल गोरे,राजु जगताप, संतोष भवर, चेअरमन रोहिदास जगदाळे, वडगाव सेवा सोसायटीचे चेअरमन गणेश पिंपळे, रंगनाथन गोरे,सोयाटी संचालक रोहिदास जगदाळे, दिपक गोर, नाथा महाराज, मा.पंचायत समिती सदस्य मच्छिंद्र खाकाळ,मयुर भवर, बिभिषण बापू, बजरंग पाडळकर,यावेळी आदी मान्यवर उपस्थित होते.

आमची अनेक दिवसांपासून स्वतंत्र विजरोहित्रची बसविण्याची मागणी होती‌. आज प्रत्यक्षात पुर्ण झाल्याने आम्ही खुप समाधानी आहोत आमचा त्रास मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. अशा प्रकारे लोकप्रतिनिधी दखल घेतली तर शेतकरी बांधवांना त्रास होणार नाही.


 विष्णु आण्णा गोरे
(विजरोहित्र लाभार्थी शेतकरी)
close