नगर । प्रतिनिधी :
सविस्तर माहिती अशी की, चर्मकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य.आणि लोकनेते सितारामजी घनदाट मामा सामाजिक प्रतिष्ठान यांच्या विशेष प्रयत्नाने व संयुक्त विद्यमाने 10 एप्रिल 2022 रोजी सकाळी दहा वाजता लक्ष्मीनारायणण मंगल कार्यालय. टिळक रोड अहमदनगर.येथे युवा उद्योग व्यवसाय शिबिर व युवा उद्योजक गौरव पुरस्कार अतिशय उत्साहात संपन्न झाला..
या कार्यक्रमासाठी राज्यातील सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा उद्योजकांना प्रमुख उपस्थितीमधील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.समाजातील युवकांसाठी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सुलभतेने उपलब्ध व्हाव्यात.या हेतूने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे, जिल्हा उद्योग केंद्र अहमदनगर, श्री संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, जात पडताळणी समिती अहमदनगर, लिडकॉम, अशा विविध शासनाचे विविध विभागामार्फत समाज बांधवाना कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली....
कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे महाराष्ट्र राज्याचे आयुक्त प्रशांत नारनवरे साहेब हे उपस्थित होते...त्यांनी समाज बांधवाना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले....कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक कानडे सर यांनी केले,तर उपस्थित मान्यवरांचे आभार सोनवणे सर यांनी मानले.....

