बदनसे निकल रहा है पसिना,
मुश्किल हो रहा है लोगो का जीना,
चेहरे सबके पड रहे है लाल,
हो गया है जीना बेहाल.
प्रतिबंध व उपाययोजना..!
भारतीय हवामान विभागाच्या वतीने जागतिक हवामान जोखीम निर्देशांक नुसार उष्ण लहरींचे प्रमाण वाढणार.
भारत हा धोक्याच्या सातव्या क्रमांकावर आहे जंगलतोड,शहरीकरण आणि प्रदूषण या घटकामुळे भविष्यात पुन्हा तापमान वाढ आणि उष्ण लहरींचा धोका निर्माण होणार असल्याची भीती आहे. विदर्भ आणि महाराष्ट्रातील काही प्रदेशात तापमान 0.5 अंश सेल्सिअस अधिक राहील या बाबत जागतिक हवामान संस्थेने देखील इशारा दिला.
नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार
मानव व वन्यजीवांचे मृत्यू आणि आर्थिक नुकसानीसोबतच अत्याधिक तापमानवाढीमुळे आणि उष्ण लहरींमुळे पर्यावरणाचे प्रचंड नुकसान होऊन नैसर्गिक आपत्तीत वाढ होणार आहे. तापमानवाढीमुळे जमिनीवरील जलसाठे कमी होतील,ध्रुव प्रदेशातील आणि हिमालयातील हिमनद्या वितळत समुद्र पातळीत वाढ होईल.मान्सूनवर परिणाम होईल.मोठी चक्रीवादळे,वादळी पाऊस,महापूर येतील. उष्ण लहरीत वाढ होईल. जनलांना आगी लागतील.वनस्पती व प्राणी यांचा अधिवास नष्ट होईल आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत.पुढे 31 मार्च ते 6 एप्रिल या काळात सुद्धा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहील.असा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तविला आहे.
उष्माघात कसा होतो
उष्माघात ही एक जीवघेणी अवस्था असून दीर्घकाळ पर्यंत अती उष्ण तापमानात उन्हात फिरल्याने किंवा काम केल्याने किंवा उष्ण वातावरणात कठोर परिश्रम (स्टर्नोअस ॲक्टिविटी) केल्यास आपल्या शरीराचे तापमान वाजवीपेक्षा जास्त गरम उच्च ताप होते.विशेषतः ही अवस्था उन्हाळ्यात. होते.यात उच्च ताप 104 डिग्री फेरनहिट (40 डिग्री सेल्सिअस) किंवा जास्त (गुदद्वारावाटे घेतल्यास) होते, हे उष्माघाताचे प्रारंभिक लक्षण होय.गोंधळलेली अवस्था ,अस्वस्थ वाटणे,अडखळत बोलणे,चिडचिडेपणा, बरगळणे,भूक न लागणे,भोवळ चक्कर येणे,झटके , बेशुद्धावस्था,शुष्क लाल /अल्पशी ओलसर त्वचा होने,मळमळ , उलटी. रक्तदाब वाढणे,मानसिक बेचैनी वाढणे, श्वासोच्छवास उथळ /जलद होने, डोके दुखणे अशी लक्षणे जाणवू लागले की समजावे आपल्याला उष्माघाताचा फटका बसलेला आहे.शरीराचे उच्च तापमान कमी करण्यासाठी हृदयावर प्रचंड ताण पडतो परिणामी नाडी जलद चालते, डोके दुखणे इ. चिन्ह लक्षणे दिसतात.याबाबत दक्षता न घेतल्यास मेंदु किंवा इतर महत्वपूर्ण अवयवाना सूज येऊन कधी न भरणारी हानी होते.मृत्यूची दाट संभावना असते.
जोखमीचे घटक
उष्माघात कुणालाही उद्भऊ शकतो.परंतु
~वय लहान मुलांमध्ये केंद्रीय मज्जा संस्थेचा विकास पुर्ण झालेला नसतो.65 वर्षांवरील लोकांमध्ये मज्जा संस्थेचा - हास होत असतो परिणामी दोन्ही वयोगटात तापमानात अचानक वाढ झाल्यास जलद्राव्य शुष्कता संभवते जी धोकादायक असते.
~ उन्हात कठोर परिश्रम ( मिल्ट्री प्रशिक्षण,खेळ: फुटबॉल लांब अंतराचे धावणे इ.) केल्यास थंड वातावरणातून उष्ण वातावरणात अचानक गेल्यास (प्रवास) ,दीर्घकाळ त्या वातावरणात राहल्यास.
~ पंखे कुलर एसीचा वापर न करणे.
~ रक्तवाहिन्या आकुंचन करणारी औषधांचे (व्हासोकंस्टीक्तर्स,
डायुरेटिक्स, अफेटामिंस, कोकेन) सेवन.
~ आरोग्याच्या काही ठराविक स्थिती : हृदय आणि फुप्फुसांचे दीर्घकालीन आजार, अतीलठ्ठ.
~जास्तीचे कपडे घालने.
~ मदिरा सेवन
~ पाणी कमी पिणे.
उष्माघाताचे रोगनिदान हे :-
गुदद्वारावाटे शरीराचे तापमान घेणे,रक्तातील सोडियम आणि पोटॅशियम ची पातळी पाहणे (केंद्रीय मज्जासंस्थेला इजा पाहणे), किडनी फंक्शन टेस्ट,लघवीचा रंग (गडद), प्रमाण (कमी)
स्नायूंचे कार्य तपासणे:- - हेबडोमायो लायसिस ( स्नायूंच्या तंतूचा - हास होऊन त्यातील पदार्थ रक्तात मिसळतो)
एक्स रे :- अंतर्गत अवयवांना इजा तपासणे.
उपाययोजना;-
प्रत्येकाने ताबडतोब खालील उष्माघातावर त्वरित उपाय न केल्यास हृदय ,मूत्रपिंड, मेंदुं आणि स्नायू यांना इजा पोहचण्याची शक्यता असते.अकाली मृत्यु होऊ शकतो.वरील लक्षणे ज्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसतात ती व्यक्ती उष्माघातची आहे असे समजून उष्णतेच्या लाटेपासून होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी त्या व्यक्तीवर त्वरित उपचार करण्यास आरंभ करावा. त्या/तीला त्वरित सावली किंवा एका खोलीत ताबडतोब हलविणे.त्या ठिकाणी त्वरित पंखा ,कुलर ची व्यवस्था करावी.व्यक्तीला ताबडतोब शरीरावरील जास्तीचे कपडे काढणे रुग्णाच्या शारीरिक तापमान खूप वाढलेले असते ते खाली आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत.
रुग्णास थंड पाण्याने अंघोळ घालावी/ स्पंज बाथ देणे त्या रूग्णाच्या बगल,मांड्या. जांघ आणि कपाळावर कापडी पट्ट्या थंड पाण्यानी ओल्या करून ठेवाव्यात /आइस पॅक लावावे कारण वाढलेले शारीरिक तापमान खाली (स्वाभाविक) आणणे अत्यंत गरजेचे असते.म्हणजे इतर महत्वाचे अवयव निकामी होणार नाही, उष्माघात झालेली व्यक्ती क्षीण झालेली असते त्या व्यक्तीवर सलाईन देण्याची व्यवस्था व्हायला हवी. हे प्राथमिक उपचार केल्यानंतर मुख्य उपचारासाठी दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असते.
उष्माघाताचा प्रतिबंध:-
दररोजच्या तापमानाच्या माहितीसाठी रेडिओ , टी. व्ही. किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करणे, सुती,सैलसर हलकी,पातळ व सच्छिद्र आवश्यक तेवढे कपडे परिधान करणे,बाहेर पडताना सन्स्क्रीन लोशन लावावे, डोक्यावर व कानावर पांढरे कापड किंवा छत्री किंवा टोपी, सनग्लास गॉगल्स, बूट किंवा चप्पलचा वापर करणे,तहान लागलेली नसताना सुद्धा भरपूर पाणी प्या, हे पाणी स्वच्छ व निर्जंतुक असावे. प्रवासा दरम्यान पाण्याची बाटली सोबत ठेवणे,शेतात किंवा अन्य ठिकाणी काम करणे अनिवार्य असेल तर सतत काम करण्यापेक्षा दर दोन तासांनी सावलीत बसून विश्रांती घ्यावी व पुन्हा कामाला लागावे त्यामुळे उष्माघाताची शक्यता कमी होईल.वैद्यकीय सल्ल्याशिवाय औषधी घेऊ नये दक्षता ठेवावी. अशक्तपणा, स्थूलपणा,डोकेदुखी,चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर.एस., घरी बनवण्यात आलेली लस्सी,लिंबूपाणी, ताक आदी पेय नियमित पिणे,याशिवाय घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर,ग्रीन व सनशेडचा वापर करण्यात यावा.उन्हाळ्यात पक्षांचे पाण्याविना हाल होऊ नयेत यासाठी प्रत्येकाने घराच्या छतावर सावलीत पाणी आणि पक्षांचे खाद्य ठेवावे.
रात्री घराच्या खिडक्या उघड्या ठेवाव्यात,
पंखे, ओले कपडे यांचा वापर करावा,
थंड पाण्याने वेळोवेळी अंघोळ करावी.
बांधकाम स्थळी किंवा अन्य ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी सूर्य प्रकाशाचा थेट संबंध टाळावा,
जास्तीत जास्त कामे पहाटेच्या वेळी करावीत,
गरोदर महिला व आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेत घरातच थांबावे.
हे टाळा:-
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नका. वाहन सावलीत लावावे.दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर जास्त तापमान असल्यास उन्हात निघणे आणि शारीरिक कामे करणे टाळा.गडद व जाड कपडे परिधान करणे टाळा.
उन्हात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक करताना स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवा.
चहा,कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेयामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने ही पेय टाळा.
शिळे व उच्च प्रथिने असलेले अन्न खाणे टाळा. तेव्हा:-
गर्मी का मौसम रहो बचके जनाब
खूब पिओ पाणी और पहनो हिजाब
क्योकी लगी यदी गर्मी की नजर
तो दुनिया मे आप नही आयेंगे नजर
अत: सूरज काना करे दिदार
क्योकि जनाब आप है समजदार.
प्राचार्य
डॉ.अजय डवले
आरोग्य व कुटुंब कल्याण
प्रशिक्षण केंद्र अमरावती

