shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीरामपूर मनसेच्यावतीने अनाथ आश्रमातील मुलांना शालेय साहित्य व अन्नधान्य वाटप..!

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १४-४-२०२२

   मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सालाबाद प्रमाणे यावर्षीही भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की अठरा ते वीस वर्षांपासून आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करत आहोत, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जो शिका,संघटित व्हा,आणि आपल्या न्याय हक्कासांठी संघर्ष करा हा मुलमंत्र दिला आहे,तो विद्यार्थ्यांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही त्यांच्या प्रत्येक जयंतीला विविध शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याचे कार्य हाती घेत असतो.

परंतु यावर्षी श्रीरामपूर येथे श्री विठ्ठल आश्रम येथील कृष्ण महाराज यांनी अनाथ आश्रम चालू करून सुमारे २५ ते ३० विद्यार्थ्यांचे ते पालन पोषण करत असल्याचे लक्षात आल्याने व अशा मुलांना शिक्षण घेण्यासाठी व खाण्यापिण्यासाठी अन्नदान, अन्नधान्याची गरज असल्याने आम्ही यावर्षी या आश्रमातील विद्यार्थ्यांना गहू,ज्वारी,तांदूळ यासोबतच शालेयपयोगी साहित्य उदा. वह्या,पुस्तके,कंपस तथा इत्यादी शालेयपयोगी साहित्य यासोबतच त्यांना दात स्वच्छ करण्यासाठी (घासण्यासाठी) टूथ पेस्ट,इत्यादींबरोबरच खाद्य पदार्थही देऊन महामानवांच्या शिकवणीनूसार जयंती साजरी केली.

तसेच भविष्यात देखील या आश्रमासाठी वेळोवेळी मदत करतच राहू जेणेकरून अनाथाश्रमातील मुले शिकून पुढे काहीतरी मोठे अधिकारी व्हावेत, जेणेकरून इतर अनाथ मुलांना यांची प्रेरणा मिळेल की रस्त्यावर भीक न मागता कुठल्यातरी अनाथ आश्रमामध्ये शिकून भविष्यात कुठल्यातरी शासकीय अधिकारी किंवा मोठमोठ्या कंपनीमध्ये काम करावे किंवा स्वतःचे व्यवसाय चालू करावी, येणारी तरुण पिढी वाया जाऊ नये यासाठी आश्रमासाठी यापुढे जी काही मदत लागेल ती सर्व मदत करत राहू असे आश्वासनही याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिले.

याप्रसंगी मनसे उपाध्यक्ष संतोष डाहाळे तालुकाध्यक्ष बाबा रोकडे, शहराध्यक्ष निलेश लांबोळे, आश्रमाचे अध्यक्ष कृष्णा महाराज,उपाध्यक्ष प्रकाश मेहेत्रे, विद्यार्थी सेना जिल्हा सचिव विशाल शिरसाट,विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष विकी राऊत,संतोष भालेराव, प्रवीण कार्ले, दीपक सोनवणे,दीपक लांडे,समर्थ सोनार,अतुल खरात, विकी शिंदे, विशाल लोंढे, विशाल त्रिभुवन, राजू शिंदे,अमोल साबणे, संदीप विशंभर,किशोर वाडीले,रोहित जवंजाळ, महेश कोलते,चेतन दिवटे,मंगेश जाधव, किशोर बनसोडे,सुमित गोसावी, विकी परदेशी,लखन शिंदे,ज्ञानेश्वर काळे, सोमनाथ गुंजाळ, ऋषिकेश सानप, किशोर अमोलिक,भास्कर मंदार, भाऊसाहेब फटांगरे, रतन वर्मा,   धर्मजिज्ञासू, किरण राऊत, सुधाकर पाटील,आकाश आदिक, दीपक जगताप,आदी पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close