shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी..!

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १४-४-२०२२

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात नुकतीच साजरी करण्यात आली. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे यांनी डॉ  बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 

या प्रसंगी विद्यालयाची इयत्ता सहावी ची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी जाधव हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य व पेरणादायी जीवन प्रवास उलगडत  भाष्य केले.याप्रसंगी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दशरथ दळवी ,अरुण तुपविहीरे, बाळासाहेब डोंगरे , ज्ञानदेव देवकर , सुंदर करांडे , संजय शेळके, सुरेश गव्हाणे शैलेश परदेशी उपस्थित होते.
close