राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १४-४-२०२२
स्वराज्य पोलीस मित्र संघटना पुणे जिल्हा संपर्क प्रमुख शेखर मासाळ यांच्या वाढदिवसा निमित्ताने घारगाव श्रीगोंदा येथील महात्मा फुले केंद्रीय प्राथमिक आश्रम शाळा येथे समक्ष भेट देऊन मुलांना खाऊ वाटप व धान्य वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला प्रामुख्याने अनाथ आश्रम शाळेचे सचिव कांचन, शिवाजी शेळके तसेच शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी, तसेच पोलिस मित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सुशांत गोरवे तसेच संघटनेचे मार्गदर्शक श्री मारुती अडागळे सर आणि स्वराज्य पोलिस मित्र संघटना बारामती व इंदापूर तालुका सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
पोलिस मित्र संघटना क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या येणाऱ्या अडचणी सोडवत पोलिस मित्र संघटनेचे चळवळ सक्षम आणि सशक्त करण्याच्या हेतूने संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व मुख्य महासचिव कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांच्या मार्गदर्शनात व राष्ट्रीय शिफारसीने राष्ट्राचे लोकशाही विचारधारा यशस्वी करण्यासाठी पोलिस मित्र संघटनेचे ध्येय धोरणे लोकसभा होता त्याला शाश्वत विकासासाठी राबविण्यात जबाबदारी घेत आहोत.पोलीस मित्र संघटना च्या वतीने पुर्णपणे मदत करू असे आश्वासन प्रदेशाध्यक्ष सुशांत गोरवे यांनी शिक्षकांना दिले.

