shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोजडे नं 2 सोसायटीची निवडणूक बिनविरोध..!


भोजडे ग्रामस्थांनी जपला सामाजिक एकोपा चेअरमन पदी, मुकुंद शा.सिनगर

शिर्डी । प्रतिनिधी :
भोजडे ग्रामस्थांनी जपला सामाजिक एकोपा चेअरमन पदी, मुकुंद शा.सिनगर तर व्हा. चेअरमन पदी दिनकर बा. सिनगर यांची निवड करण्यात आली. 

धार्मिक भावना जपत भोजडे गावात सर्व ग्रामस्थांना एका कुटुंबाप्रमाणे जपणारे संस्थेचे मार्गदर्शक चेअरमन मा. मुकुंदराव पा. सिनगर यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच भोजडे नं 2 विकास सोसायटीची निवडणूक अखेर बिनविरोध पार पडली. यात एकूण 13 संचालक विजयी घोषित करण्यात आले. त्यानुसार आज संस्थेच्या सभागृहात नवनिर्वाचित संचालक मंडळाची पहिली बैठक पार पडली असता सर्वानुमते संस्थेच्या चेअरमन पदी मा. मुकुंद शहाराम पा. सिनगर यांची तर व्हा. चेअरमन पदी मा. दिनकर बा. सिनगर यांची निवड जाहीर करण्यात आली.

कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातुन सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या भोजडे गावातील सोसायटीची निवडणूक बिनविरोध झाल्याने सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे. सर्वप्रथम संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. सिताराम पाटील सिनगर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी सहकार व सामाजिक सलोखा जपण्यात घालवलं, असे कै.सिताराम पाटील सिनगर यांचे नाव संस्थेस देणेबाबत मांडलेला ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी गेल्या दहा वर्षांपासून स्वखर्चाने संस्थेला उर्जीतवस्था प्राप्त करून देण्याबरोबरच संस्थेत कुठल्याही स्वरूपाच्या आर्थिक खर्चाची तरतूद केली नसल्याने सर्वानुमते त्यांचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला.
आज संस्थेला यशोशीखरावर नेण्यात मा. संचालक मंडळाचा मोलाचा वाटा असून सभासदांच्या विश्वासावर पारदर्शक कारभार करत संस्थेचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी तज्ञ् संचालकांची नेमणूक करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
यावेळी नवनिर्वाचित संचालक मंडळात जेष्ठ संचालक मा. ज्ञानेश्वर बबरू पा. सिनगर, रामनाथ चां. चंदणे, रावसाहेब दे. सिनगर, कुंडलिक रा. घुले, विजय दा. सिनगर, फकिरचंद रा. जेऊघाले, अशोक रा. मंचरे, राजेंद्र गो. घनघाव, सौ. प्रमिला ग. गोंदकर, सौ. वंदना ब. सिनगर, सौ. जिजाबाई भि. शिंदे आदींचा समावेश असून अनुभवी आणि तज्ञ् संचालकांच्या जोरावर संस्थेची प्रगती निश्चित असल्याचे प्रतिपादन करत संस्थेचे सचिव श्री.जालिंदर टेके यांनी नवनिर्वाचित संचालक मंडळाचे मनःपूर्वक स्वागत केले.

भोजडे ग्रामस्थांच्या साथीने सर्व सभासदांच्या विश्वासावर संचालक मंडळ संस्थेच्या विकासासाठी कटीबद्ध असून अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अधिमंडळाची पहिली सभा पार पडली. यावेळी प्रास्ताविकपर स्वागत सचिव श्री. जालिंदर टेके यांनी केले तर मावळते संचालक श्री. संतोष शे. सिनगर यांनी आभार मानले.
close