चंद्रपूर-किरण घाटे जि.प्र.
अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली ,महाराष्ट्र शाखेच्या नेतृत्वात, तसेच बेलदार व तत्सम समाज संघटना , भोई व तत्सम समाज ,गोंधळी समाज लोहार समाज आणि गोलकर समाज संघटनेने ओबीसी, वि. जे. एन. टी. सह बाराबलुतेदार मायक्रो ओबीसी यांचे सर्वांगिण विकास होण्यासाठी राजकीय आरक्षण अखंडीत ठेवावे व शक्य झाल्यास विमुक्त भटक्या जमातींना वेगळे आरक्षण द्यावे अश्या आशयाचे निवेदन नागपुर स्थित प्रादेशिक आयुक्तालय प्रशासकीय कार्यालय नागपुर यांचे कडे शनिवार दि २८मे ला दिले. याच दिवशी दुपारी ४.३० वाजता पूर्वाश्रमीचे नागरिकांचे मागासवर्गीय प्रवर्ग (ना. मा. प्र.) राजकीय आरक्षण पुन्हा अखंडीत सुरू करणे बाबत आयोगाचा दौरा विभागीय आयुक्त नागपुर विभाग नागपुर येथे विशेष मोहीम अंतर्गत आयोजित केला होता . दरम्यान समाजिक संघटनाचे प्रतिनिधि व राजकीय पक्ष व विविध संघटनांसह विवीध बुध्दिजिवी नागरिकांचे मते या वेळी जाणुन घेतले. जनसामान्यांचे सर्वांगीण विकासासाठी समाजाभिमुख निर्णय घेऊन विमुक्त भटक्यासह ओबीसी समाजाला सर्वांगीण विकास साधण्यास राजकीय आरक्षण अखंडीतपणे चालू ठेवणे बाबत प्रतिनिधींच्या मुलाखती व चर्चा झाली
ओबीसी व्ही. जे. एन टी. राजकीय आरक्षण बाबत
विमुक्त भटक्या समाज संघटना व ओबीसी प्रवर्गातील विविध संघटनांनी आयोगाला निवेदने सादर केलीत.यावेळी महाराष्ट्र प्रदेशकार्याध्यक्ष आनंदराव अंगलवार ऑल इंडिया डी. एन. टी वेलफेअर संघ दिल्लीचे चंद्रशेखर कोटेवार , रंजनाताई पारशिवे , दिपक नागपुरे, नागपुर जिल्हाध्यक्ष, धिरजलाल भारद्वाज, विलास दंडारे , रतन शिलावार, मनिष कन्नमवार, रविंद्र बंडीवार, अजय मैकलवार, दिवाकर बावणे,सुभाष घोंगरे, विजय पोहनकर प्रभाताई चिलके, सुभाष हजारे , विठ्ठल कुसळे, आदीं उपस्थीत हो


