shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी AISTA's च्या चौथ्या साखर व इथेनॉल कॉन्क्लेव्ह 2022 ला केले मार्गदर्शन.

*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी AISTA's च्या चौथ्या साखर व इथेनॉल कॉन्क्लेव्ह 2022 ला केले मार्गदर्शन.
    इंदापूर प्रतिनिधी:मुंबई येथे झालेल्या AISTA's च्या चौथ्या साखर व इथेनॉल कॉन्क्लेव्ह 2022 ला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे उपस्थित राहत त्यांनी देश व जगभरातून आलेल्या साखर-इथेनॉल, साखर उत्पादक, साखर रिफायनरी, गुंतवणूकदार यांना मार्गदर्शन केले.
    हर्षवर्धन पाटील म्हणाले की,' साखर व इथेनॉल कॉन्क्लेव्ह 2022 हा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे, जो भारतीय आणि परदेशी व्यक्तींसाठी तयार केलेला हा उपक्रम आहे. साखर, इथेनॉल, साखर उत्पादक, साखर रिफायनरी, गुंतवणूकदार, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारी व या सर्व क्षेत्रातील मान्यवरांना एकाच ठिकाणी भेटण्याची संधी देतो.या अर्थाने AISTA's च्या साखर व इथेनॉल कॉन्क्लेव्ह 2022 ला महत्त्व आहे.'
close