shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रीय अध्यक्ष रा.स.पा.महादेव जानकर यांच्या हस्ते शुभम सुर्वे यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित.

"

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व  राष्ट्रीय अध्यक्ष रा.स.पा.महादेव जानकर यांच्या हस्ते शुभम सुर्वे यांचा विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित.
 
साद फाऊंडेशन, इंदापूर" (रजि.) या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव.
इंदापूर प्रतिनिधी: "इंदापूर भूषण" पुरस्कार वितरण सोहळा २२ में २०२२ रोजी सकाळी १०:३० सौ. ललिताबाई लालचंद कार्यालय , वालचंदनगर ता.इंदापूर जि.पूणे येथे संपन्न झाला, त्यावेळी इंदापूर तालुक्यातील राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत अन्य काही दिग्गज मान्यवरांचा गौरव झाला परंतु, त्यामधील एक नाव खूप चर्चेत आहे ते म्हणजे शुभम सूर्वे.शुभम सध्या 'ANEKANT INSTITUTE OF MANAGEMENT STUDIES' येथे आपले 'MBA' मधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करत आहेत, त्यांना यावर्षीचा मानाचा 'Mr. FRESHER' 2021-22 हा पुरस्कार मिळाला होता तसेच प्रथम सत्रात त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये 450 पैकी 404 गूण मिळाले आहेत व सामाजिक कार्यामधील अप्रतिम सक्रिय सहभाग अशा अष्टपैलू व्यक्तिमत्वाला विशेष गौरव पुरस्काराने सन्मानित  विद्यमान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व महादेव जानकर राष्ट्रीय अध्यक्ष रा.स.पा. यांच्या शुभहस्ते करण्यात आले.शुभम सुर्वे सारखा आदर्श आजच्या तरुणाईने घेणं गरजेचं आहे.
close