प्राथमिक शिक्षक श्री.सुनील सिद्राम धुरुपे, यांना '"नॅशनल लेव्हल प्रतिभा सन्मान अचिव्हर्स अवॉर्ड प्रदान""
इंदापूर प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,ढुकेवस्ती, ता. इंदापूर, जिल्हा -पुणे.येथे कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक श्री. सुनील सिद्राम धुरुपे* *यांना शिक्षण क्षेत्रात २००६ पासून आत्तापर्यंत १६ वर्षात केलेल्या उल्लेखनीय कार्याची" मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) मुंबई यांनी दखल घेऊन नॅशनल लेव्हल प्रतिभा सन्मान अचिव्हर्स अवॉर्ड- २०२२ " सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय सदाशिव पेठ, पुणे येथे प्रदान करण्यात आला. इंटरनॅशनल आयकॉन डॉ. जे. सानिपिना राव आणि ह-भ-प श्री. श्याम सुंदर सोन्नर महाराज आळंदीकर यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शुभदा जोशी, प्रकाश गवळी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- संस्थापक, अध्यक्ष, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी , मुंबईचे श्री. कृष्णाजी जगदाळे साहेब यांनी केले. सदर पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, गौरवपदक, सन्मानचिन्ह, मानकरी बॅच, महावस्त्र व सन्मानपत्र असे होते.महाराष्ट्रातील निवडक शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला त्यामध्ये धुरूपे सरांची निवड झाल्यामुळे शिक्षक वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे

