वडापुरी सोसायटीच्या निवडणूकीत ९ जागा जिंकत श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचा विजय.
उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये गुलालाची उधळण करीत जल्लोष.
इंदापूर प्रतिनिधी:श्री नाथ वडापुरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडापुरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन २०२२-२३ ते २०२६-२७ मतदान प्रक्रिया दिनांक २२ मे २०२२ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूरी येथे शांततेत पार पडली. या मतदानामध्ये सुमारे १२५० मतदार सभासद असून त्यापैकी ९०८ सभासदांनी मतदाननाचा हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जे.पी. गावडे यांनी काम पाहिले.
श्री नाथ वडापुरी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडापुरी च्या निवडणुकीमध्ये दोन पॅनल एकमेकांच्या विरोधात उभे राहिले त्यामध्ये श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल व श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल यांच्या मध्ये प्रत्येकी १३ -१३ म्हणजेच २६ उमेदवारांमध्ये निवडणूक लढवली गेली आहे. यामध्ये काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे ९ उमेदवार निवडून आले तर श्रीनाथ परिवर्तन पॅनलचे ४ उमेदवार निवडून आले.
यामध्ये श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचा ९ जागा जिंकत विजय झाला. या पॅनलची प्रचारची धुरा दत्तात्रेय शिर्के, किसन सावंत- पाटील, गुलाब पवार, रमेश गायकवाड व इतर मान्यवर यांनी संभाळत विजय खेचून आणला.
श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे*
१)तानाजी पांडुरंग पिंगळे
२)ज्ञानदेव रामचंद्र शिर्के
३)प्रल्हाद राजाराम जाधव
४)सविता ज्ञानेश्वर काटकर
५)बाळू तुकाराम जाधव
६)राजेंद्र विठ्ठल तोबरे
७)गुलाब निवृत्ती पवार
८)हरिदास रामचंद्र फडतरे
९)गोरख किसन चंदनशिवे
श्रीनाथ परिवर्तन विकास पॅनल चे विजयी उमेदवार:
१)दिलीपबाई आबा सुर्वे
२)हनुमंत बापूराव जगताप
३)धीरज शिवाजी काटकर
४)प्रताप केरबा बागल

