shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एवढा विकास निधी आनने हे येड्या गबाळ्याचे काम नाही रे बाबांनो - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.

एवढा विकास निधी आनने हे येड्या गबाळ्याचे काम नाही रे बाबांनो - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे.
इंदापूर प्रतिनिधी:  मी किती कोटीची काम केली. याबद्दल तुम्हाला बोलणार नाही. एवढं काम करतो. तालुक्यात विकासाचा निधी आणतो. हा निधी आणणे एवढं सोपं नसतं. त्यासाठी किती झिजाव लागतं. किती पळावं लागतं हे माझ्या जिवालाच माहित आहे. एवढं काम करताना कधी कधी वाईट वाटतं. एवढं काम करतो वेळ देतो तालुक्यासाठी वेळ देताना सुद्धा काही विरोधक टीका टिपणी करतात. त्यावेळी झोपताना मला काय त्रास होत असेल हे माझ्या जिवालाच माहित आहे. आज तुम्हा लोकांना सांगतो. काम करणं एवढा विकास निधी आणणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही रे बाबांनो. त्यासाठी खूप काम करावं लागतं बाबांनो. अशा शब्दात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पळसदेव बिजवडी जिल्हा परिषद गटातील ९७ कोटी २४ लाख रुपयांची विविध विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ (दि.२१मे)वेळी जाहीर सभेत बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 
यावेळी प्रवीण माने,प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अतुल झगडे, श्रीमंत ढोले, सचिन सपकाळ,दीपक जाधव,बापूराव शेंडे, शिवाजी पानसरे, महारुद्र पाटील, छायाताई पडसळकर, शुभम निंबाळकर, अण्णासाहेब धोत्रे, शिवाजी तरंगे, बाळासाहेब काळे, तसेच गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

या वेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,तालुक्याचा  चांगला विकास आराखडा तयार करून सर्वांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत असून काम करताना मोठे पण घेत नाही. डोलारा पेटवत नाही परंतु या लोकांना माणसांना काम करायचं नाही.यांना टीका करायची आहे. यांना दुसरे काहीच काम नाही म्हणून सर्वांनी ह्या जातीवादी टीकेला तुम्ही थोडं लक्षात ठेवलं पाहिजे. या लोकांना त्यांची जागा दाखवली पाहिजे.

पुढे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,बाळासाहेब काळे, नाना, मेघराज कुचेकर यांनी मनोगत व्यक्त करताना या भागातील अडचणी संदर्भातील मागण्या मांडल्या. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने, दीपक जाधव यांनी त्यांच्या भाषणामध्ये सविस्तर माहिती विकासाबद्दल दिली. विकासाबद्दल प्रत्येकाचे काम मार्गी कसे लागेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
 खडकवासल्याच्या शेतकऱ्यांना जबाबदारीने सांगतो. मामा अजून थांबला नाही. या खडकवासल्याच्या योजनेसाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न करणार. शेवटी काही गोष्टी मध्ये कोर्टाचा आधार घ्यावा लागेल. या खडकवासलाच्या पाडण्यासाठी जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न केला जाईल. पुनर्वसनचे  जे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नासाठी पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली थोड्या दिवसातच बैठक लावू आणि अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू या पळसदेवकरांनी व या भागातील सर्वांनी विकास कामाबाबत माझ्यावर सोडून द्या असेही यावेळी म्हटले.
close