श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
श्रीरामपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील वडाळा महादेव या गावची सुपुत्री व माजी सैनिक श्री रंजकराव पा. कसार यांची सुकन्या डॉ.रुचिका कसार यांचे सिनेमा कला क्षेत्रात "लगन" या मराठी सिनेमांमध्ये मोठ्या पडद्यावर छोट्या भूमिकेद्वारे पदार्पण केले आहे.
डाॅ.रूचिकाचे डॉक्टरकीचे शिक्षण चालू असतानी कलाक्षेत्रात कोणताही वारसा नसताना सुद्धा स्वतःच्या प्रयत्नाने पदार्पण केले, हे खूप कौतुकास्पद असून भावी आयुष्यात तिला डॉक्टर तसेच कलाक्षेत्रात अभिनेत्री म्हणुन यश मिळेल यात शंका नाही.
तिने आपल्या वडिलांना प्रामाणिकपणे देशसेवा व मेहनत करताना पाहिले आहे. अतिशय गरिबीतून वडीलांनी शिक्षण घेऊन भारतीय सैन्य दलात यशस्वीरित्या काम करून नावलौकिक मिळविले. हा वारसा घेऊनच रुचिकाने देखील प्रचंड मेहनतीच्या जोरावर आरोग्य सेवेत व कला क्षेत्रात आपला पाय रोवला आहे. हे वडाळा महादेव ग्रामस्थांच्या दृष्टीने तिचे हे काम काही कमी नाही..!
पुढील यशासाठी "शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह" परिवाराचे वतीने रुचिकास खूप खूप मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा...!

