नगर प्रतिनिधी (शिवा म्हस्के)
नगर तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. नगर तालुक्यातील अनेक गावांत उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होत असते अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा टॅकरने पाणी पुरवठा होतो.
पाण्या साठी माणसाला भटकंती करण्याची वेळ येते तर यातुन मुके प्राणी कसे सुटतील रुईछत्तीसी शिवारात पशुपक्षी यांना उन्हाळ्यामध्ये पाण्यासाठी वणवण भटकावे लागते,अन्नाची गुजराण कशीही भागवली जाते,पण पाण्यासाठी त्यांना खूप कसरत करावी लागते,यासाठी उन्हाळ्यात जेव्हा पाण्याची तीव्र टंचाई जाणवते त्यावेळी प्राणी मित्र नाथ महाराज गोरे माळरानावर पशुपक्षांची तहान भागविण्यासाठी स्वतःच्या स्वखर्चाने टँकरने पाणी उपलब्ध करुन देतात,हा त्यांचा उपक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे,त्यामध्ये खंड न पडता अविरतपणे ही सेवा सुरू आहे,मागील वर्षी टँकर सोडल्या बरोबर हरीण कळप पाणी पिण्यासाठी धावून आले होते. हि घटना अनेकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिल्याचे सांगतात,हेच पुण्य माणसाचे बरोबर येते याचे हे मूर्तिमंत उदाहरण.." म्हणजे नाथ महाराज हे कामा कोणत्याही प्रकारची प्रसिद्ध साठी कधी कुठे हे गाजावाजा करत नाही.
किंवा फोटोसेशन करत नाही हे स्थानिक नागरिक चर्चा करताना नेहमी सांगतात त्यांचे हे काम प्रामाणिकपणे सुरू आहे.

