ब्राह्मण संघटन च्या अध्यक्ष पदी किरण कुलकर्णी !!
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
अक्षय तृतिया भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवा निमित्त शिवराज मुथळे यांच्या निवासस्थानी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आरती व प्रसाद स्वरुपात साजरी केली यावेळी ह. भ. प. लक्ष्मण महाराज इनामदार यांनी भगवान परशुराम यांच्या चरित्रावर मार्गदर्शन केले यावेळी ब्राह्मण बांधव उपस्थित होते . यावेळी ब्राह्मण संघटन च्या अध्यक्ष पदी किरण कुलकर्णी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील समर्थ नगर भागात शिवराज मुथळे यांच्या निवासस्थानी भगवान परशुराम यांच्या प्रतिमेस पुष्पहार आरती व प्रसाद स्वरुपात साजरा करण्यात आला. ह. भ. प. लक्ष्मण महाराज इनामदार यांनी भगवान परशुराम हा श्रीहरी विष्णू यांचा अवतार असुन अनन्य साधारण महत्त्व असलेला अवतार असे सांगितले .
यावेळी ब्राह्मण संघटन च्या अध्यक्ष पदी किरण कुलकर्णी तांबवेकर याची सर्वानुमते निवड करण्यात आली त्यांचा यावेळी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आली उर्वरीत कार्यकारीणी लवकरच जाहीर करण्यात येईल असे सांगितले यावेळी धनंजय कुलकर्णी , श्रीराम शेटे , श्रीधर खोत , ह. भ, प. लक्ष्मण महाराज इनामदार , शिवराज मुथळे , पि टी कुलकर्णी , अनंत कोकीळ , अतुल कुलकर्णी , चंद्रकांत पाटील , गजानन औसेकर , अदित्य विडेकर , विकास पोपळे , अदित्य कुलकर्णी आदी उपस्थित होते. *किरण कुलकर्णी यांचे निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

