shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी  दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्याचे आमदार व राज्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिनांक ३ मे २०२२ रोजी इंदापूर येथील ईदगाह मैदानावर उपस्थिती दर्शवून रमजान ईद च्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या.

 यावेळी राज्यमंत्री भरणे म्हणाले की, मुस्लिम बांधवांच्या विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच या वर्षामध्ये इंदापूर शहर मुस्लिम बांधवांसाठी तीन कोटी रुपयांचा विकास निधी तर ग्रामीण भागासाठी चार कोटीचा निधी विविध विकास कामांच्या साठी दिल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. तसेच अजून काही विकास कामासाठी इथून पुढच्या काळामध्ये ही लागेल तो निधी देण्याचे त्यांनी आश्वासित केले.

 ते पुढे म्हणाले की, रमजान ईद हा सण आपण सर्वजण एकत्र रित्या साजरा करतो. एकत्र नमाज पठण करतो  तसेच  गरीब माणसाला मदत करून या महिन्यात एकोप्याचा संदेश दिला जातो. इंदापूर तालुक्यातील हिंदू मुस्लीम एकोप्याने वागतात एकत्र राहतात एकत्र नांदतात याचा तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून मला आनंद आहे. आज तुमच्या आशीर्वादाने मी तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहे .सर्व समाजाला सर्व धर्माला पुढे घेऊन जाणे माझे काम आहे. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
close