shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सुशिक्षित वर्गाने सविधान वाचवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असावे ; दिशा पिंकी शेख

श्रीरामपूर (शौकतभाई शेख) :-  स्वतंत्र समता शिक्षक संघ व परिवर्तन शिक्षक मित्र श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ येथील संगमनेररोडवरील शासकीय व्ही.आय.पी. रेस्ट हाऊस याठिकाणी संपन्न झाला. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या दिशा शेख यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली. 

यावेळी बोलताना दिशा शेख म्हणाले की,सुशिक्षित वर्गांना ज्यांना ज्यांना फुले शाहू आंबेडकर यांची चळवळ समजलेली आहे,आकलन झालेले आहे त्यांनी त्याप्रमाणे आचरण करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे तसेच महिलांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग अंधश्रद्धा दूर करण्यासाठी केला पाहिजे,दैनंदिन जीवनामध्ये विज्ञाननिष्ठ बनले पाहिजे तरच लोकशाही टिकेल व संविधान बळकट होईल असेही त्या म्हणाल्या,तसेच स्वतंत्र समता शिक्षक संघ अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र विधाते यांनी आपल्या मोगतातून उत्तम प्रकारे अनमोल मार्गदर्शन केले,उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम,ट्रॉफी, प्रमाणपत्र देण्यात आले,श्याम रणपिसे यांनी विजेत्या स्पर्धकांना व परीक्षकांना पुस्तके वाटप केली, स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे विद्यार्थी गट प्रथम क्रमांक प्रज्ञा रेवन्नाथ वाणी, द्वितीय क्रमांक साक्षी संदीप भामरे, तृतीय क्रमांक मयूर राम भारस्कर, विद्यार्थी गटासाठी राजाबाई कांबळे (महिला आघाडी प्रमुख स्वतंत्र समता शिक्षक संघ) यांनी तर शिक्षक गटासाठी परिवर्तन शिक्षक मित्र यांनी योगदान दिले .

शिक्षक गट प्रथम क्रमांक सतीश उकिरडे , द्वितीय क्रमांक मंगल सातोरे, तृतीय क्रमांक विनोद कांबळे, स्पर्धा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी परीक्षक म्हणून इक्बाल काकर,राजेंद्र हिवाळे, पुनम रूपवते,भाऊसाहेब महाडदेव, शीतल गुंजाळ यांनी कामकाज पाहिले.(शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर शिक्षक,शिक्षिका सर/मॅडम आहेत.) प्रमुख उपस्थितीमध्ये  दिशा पिंकी शेख, महेंद्र त्रिभुवन, राजेंद्र विधाते, प्रवीण मगर,सुरेश कांबळे, सतीश जाधव,राजेंद्र खरात, रमेश गायकवाड ,नसीर सय्यद, संघमित्रा रोकडे ,राजाबाई कांबळे ,सुरेखा लोंढे, सुनिता नरवडे,अर्चना जाधव,बाळासाहेब पाटोळे,जयराम पठारे, श्याम रणपिसे,प्राध्यापिका पुनम रूपवते, प्राध्यापक किरण रूपवते,एम.एस.गायकवाड सूर्यवंशी आदि उपस्थित होते,कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजाबाई कांबळे यांनी केले, स्वागत राजेंद्र खरात यांनी तर सत्कार सुरेश कांबळे व रमेश गायकवाड यांनी केले .

कार्यक्रमाचे संयोजन व सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले.
close