भिमाई आश्रमशाळेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
आयु.शकुंतला मखरेंच्या हस्ते ध्वजारोहण
इंदापूर प्रतिनिधी: (दि.१) - येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, ज्युनिअर कॉलेज, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण इंदापूर नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेचे अध्यक्षा. आयु.शकुंतला रत्नाकर मखरे (काकी) यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे , मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे, उपप्राचार्या सविता गोफणे,सर्व शिकक्षक,प्राध्यापक,अधीक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल चंदनशिवे
यांनी केले.

