संघटनात्मक एकोपासह प्रतिस्पर्धाकावर मात कसे करायचे ते या क्रिकेट खेळामधून दिसून येतो - अमोलराजे इंगळे.
शेळगाव येथे राजवर्धन चषक २०२२ टेनिस बॉल क्रिकेट महासंग्रामाचे उद्घाटन संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील शेळगाव येथील वैदुवाडी येथे लाईट बोर्ड कॅनल नजीक दिनांक १ मे २०२२ रोजी राजवर्धन चषक शेळगाव वैदुवाडी २०२१ या भव्य टेनिस बॉल स्पीच क्रिकेटचा महासंग्रामाचे उद्घाटन कर्मयोगी कारखान्याचे संचालक आबासाहेब शिंगाडे व युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला.
यावेळी कर्मयोगी कारखान्याचे संचालक राहुल जाधव, युवा नेते महेश खराडे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग सुपुते, युवा नेते रविराज बाळे पाटील, सुरज वाघमोडे, बबलू निंबाळकर ,साहिल वाघमोडे ,किरण सूर्यवंशी, बाजीराव वाघमोडे ,अशोक काळे, समीर लोखंडे, सुनील सूर्यवंशी, अशोक सूर्यवंशी, महेश निंबाळकर, रमेश वाघमोडे, राजे निंबाळकर इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अमोलराजे इंगळे यांनी म्हटले की, युवकांनी शरीर तंदुरुस्तीसाठी खेळ खेळणे आवश्यक असून यामध्ये युवकांचा कल हा क्रिकेट सारख्या खेळाकडे असून या खेळा मधून निश्चितच युवकांना शारीरिक तंदुरुस्ती सांभाळता येते तसेच आपले शरीर संपत्ती या मधून जपता येते. शारीरिक व्यायामामुळे बौद्धिक विकास होतो. संघटनात्मक एकोपा कसा असावा आणि प्रतिस्पर्धाकावर मात कसे करायचे ते या क्रिकेट खेळा मधून दिसून येतो असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी अमोलराजे इंगळे यांच्यासह उपस्थित पदाधिकारी यांनी स्वतः फलंदाजी व गोलंदाजी करून या क्रिकेट महासंग्रामाचे उद्घाटन केले. या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन राजवर्धनदादा युवा मंच शेळगाव वैदवाडी यांच्यावतीने करण्यात आले.

