shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पहाडावर पडला काही गावांत पिण्याचा पाण्याचा दुष्काळ..!!


▪️आसापूर ग्रामवासीयांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करून द्या -सुदाम राठोड यांची मागणी
चंद्रपूर◼️किरण घाटे जि.प्र.◼️विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याच्या अतिदुर्गम भागात मोडणा-या जिवती तालुक्यातील आसापूर ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या मौजा आसापूर येथे मागील ऑक्टोबर महिन्यात पिण्याच्या पाण्याची विहीर ढासळली. 

त्याच गावात बोर विहीर आहे .पण ती या उन्हाळ्यात पूर्णपणे कोरडी पडली असुन गावकऱ्यांना सद्यास्थितीत पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे.  दरम्यान गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात ही बाब सांगितली .पण त्यांची ही महत्वाची समस्या सुटली नाही.प्रशासकीय अधिकारी हे फक्त पगार घेण्यासाठीच आहे का असा प्रश्न सुध्दा गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जय विदर्भ पार्टीचे नेते सुदाम राठोड यांनी आज आसापूर ग्रामवासीयांची समस्या घेऊन थेट गट विकास अधिकारी जिवती यांची भेट घेतली व त्यांना या बाबतीत एक निवेदन सादर केले.  


तात्काळ या गावात टँकरची सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी केली. ही व्यवस्था करून न दिल्यास जय विदर्भ पार्टी रस्त्यावर उतरेल अश्या प्रकारचा इशारा देखिल या निवेदनातुन दिला आहे.या वेळी  सुदाम राठोड , महादेव सोयाम, दिनेश सोयाम, बापूराव उईके व आसापूरचे शेकडों नागरिक उपस्थित होते.जिवती तालुक्यातील ब-याच गावात पिण्याच्या पाण्याची समस्या या वर्षी असल्याचे बोलल्या जाते .
close