पारनेर | श्रीनिवास शिंदे
पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील सु.ग.लंके माध्यमिक व अ.ना.एरंडे उच्च माध्यमिक विद्यालयाचा शासकीय रेखाकला परिक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे.या विद्यालयातील विद्यार्थीनी व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हा सचिव तथा पालनेर तालुका अध्यक्ष दत्ता गाडगेसर यांची सुकन्या कु.सोनिया दत्ता गाडगे हिने " ए " ग्रेड मिळवुन ति प्रथम श्रेणीमधे उत्तीर्ण झालेली आहे.तिला सु.ग.लंके विद्यालयाचे कलाशिक्षक संजय खोडदेसर तसेच तिचे वडील दत्ता गाडगेसर व जेष्ठ चित्रकार उर्मिला दुर्गुडे यांनी बहुमुल्य असे मार्गदर्शन केले होते.
या रेखाकला परीक्षेमुळे इयत्ता १० वीच्या एकुण १२ विद्यार्थ्यांना श्रेणीनुसार एकुण ७० वाढीव गुणांचा लाभ होणार आहे.
सोनियाच्या यशाबद्दल पारनेरचे आमदार निलेश लंके,श्रीविघ्नहर सहकारी साखर कारखाना जुन्नरचे चेअरमन सत्यशिलदादा शेरकर,अहमदनग जि.प.चे बांधकाम व कृषी समितीचे सभापती काशिनाथ दातेसर,सु.ग.लंके विद्यालयाचे प्राचार्य पी.टी. कापडणीस सर,माजी जि.प. सदस्य राजाराम एरंडे, वडझिरेचे सरपंच निलेश केदारी,माजी सरपंच शिवाजीराव औटी, निलेश लंके प्रतिष्ठाणचे युवक तालुका अध्यक्ष अनिल गंधाक्ते,माजी सरपंच बाळासाहेब दिघे, सोसायटी चेअरमन पोपट मोरे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दिघे, संभाजी एरंडेसर, प्रशांत दिघे,जाधवसर आदींनी अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
------------------
पारनेर तालुक्यातील बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क
श्रीनिवास शिंदे
👉 9730828280
पारनेर तालुका प्रतिनिधी
शिर्डी एक्सप्रेस

