shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लगन चित्रपटाच्या मुख्य कलाकारांची कडा येथे भेट ; अमोलक कॉलेज व कडा ग्रामपंचायत तर्फे सत्कार संपन्न


 प्रतिनिधी :  सिराज शेख

कडा : ९  /  कडा येथे लगन चित्रपटाच्या मुख्य कलाकारांनी अमोलक कॉलेज व ग्रामपंचायत येथे भेट दिली . बहुचर्चीत मराठी चित्रपट लगन दि . ६ मे रोजी सर्वत्र रिलीज झाला आहे .त्या चित्रपटाचे डायरेक्टर  अर्जुनराव गुंजार प्रोड्युसर मुस्तफाभाई सय्यद हे आहेत .

या चित्रपटामध्ये ज्यांनी भुमिका केली ते कलाकार सुजित चौरे व श्वेता काळे यानी कडा येथे भेट दिली . यामध्ये अमोलक जैन विद्या प्रसारक मंडळ भेट दिली प्रा, जमीर सर, प्रा, राठी सर, मुख्याध्यापक पडोळे सर, मोसीम सर ,हारकर सर, गोंदकर सर ,जाधव सर, व तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी लगन या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या .यावेळी सुजित चौरे व श्वेता काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले .

व कडा ग्रामपचांयत कार्यालय येथे सरपंच अनिल तात्या ढोबळे मा. सभापती रमजान तांबोळी ग्रामसेवक आबासाहेब खिलारे मा . सरपंच राम मधुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रा पं सदस्य अन्सार सय्यद , बाळासाहेब देशमुख, डॉ जाधव, डॉ टेकाडे, बबलु पानसारे कडा ग्रामस्त व पत्रकार आयुब मोमीन, अनिल मोरे, सिराज शेख तसेच कलकारा सोबत केरूळ येथील बबलु शेख, अमीर शेख, व परवेज शेख हे उपस्थित होते.
close