shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लोकन्यायालयात २४ हजार ३३८ प्रकरणे निकाली;५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची वसुली..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                      दिनांक १० मे २०२२

लोकन्यायालयात २४ हजार ३३८ प्रकरणे निकाली;५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची वसुली..!!

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा व सर्व तालुका न्यायालयात ७ मे रोजी लोकन्यायालयात आयोजन करण्यात आले होते. यात १ लाख ३६ हजार ३०९ प्रकरणे ठेवण्यात आली होती. यापैकी लोकन्यायालय व विशेष मोहिमेतील २४ हजार ३३८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढत ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रूपयांची वसूली करण्यात आली, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव रेवती देशपांडे यांनी दिली.

अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार आणि सेंट्रल बार असोसिएशनतर्फे राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये लोकन्यायालय झाले. राष्ट्रीय लोकन्यायालयामध्ये अहमदनगर जिल्ह्याचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा व्दितीय क्रमांक आलेला आहे. अहमदनगर जिल्ह्याने लोकन्यायालयामध्ये तिसऱ्यांदा द्वितीय क्रमांक मिळवण्याची हॅट्रीक केली आहे.

जिल्ह्यात १७ हजार ७२० दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २ हजार ६१३ प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, स्पेशल ड्राईव्ह (विशेष मोहीम) मध्ये ४ हजार ५ केसेस निकाली करण्यात काढण्यात आल्या. सदर लोकन्यायालयात ५५ कोटी ४० लाख ९४ हजार रुपयांची रकमेची वसूली करण्यात आली. लोकन्यायालय व स्पेशल ड्राईव्हमध्ये एकुणे २४ हजार ३३८ प्रकरणे निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये वाहतुक यंत्रणांची प्रकरणे समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.


प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर वें. यार्लगड्डा, न्यायाधीश मिलिंद कुर्तडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकन्यायालय पार पडले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close