शिर्डी । प्रतिनिधी :
ब्राह्मण एकता मंच शिरडी आयोजित परशुराम जयंती निमित्त सिलव्हर ओक लाॅन्स शिरडी येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. ब्राम्हण सभेचे अध्यक्ष धनंजय पाटील, उपाध्यक्ष अरूण कुलकर्णी, अमित देशमुख, गुरुप्रसाद कापरे व तसेच ब्राह्मण एकता मंच शिर्डी सदस्य, त्याच प्रमाणे महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ आरती पाटील त्याच प्रमाणे समस्त ब्राह्मण महिला आघाडी मार्गदर्शक प्रकाश खोत आणि दिलीप सुलाखे गुरुजी होते.
प्रमुख पाहुणे म्हणून आनंदजी दवे अध्यक्ष ब्राम्हण महासंघ महाराष्ट्र हे होते. सुत्रसंचालन सौ सुनिता उपासनी आणि सागर कुलकर्णी यांनी केले. समाजा मधील समाज रत्नपुरस्कार डाॅ प्रबोध जोशी साहेब तसेच डाॅ.पितांबरे मॅडम, डाॅ.ओंकार जोशी साहेब यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन समाज भुषण पुरस्कार गजानन शेर्वेकर अध्यक्ष सन्मित्र युवक मंडळ, सर्पमित्र श्री .स्वपनिल जोशी, शरीर सौष्ठव स्पर्धा जिंकणारे श्री किरण पाटील तसेच ,इंडियन आॅयडोल स्पर्धा जिंकणारी कु. सुरभी गुणवंत विद्यार्थी ,सेवा निवृत्त कर्मचारी यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. आनंद दवे आणि पितांबरे मॅडम डाॅ ओंकार जोशी गजानन शेर्वेकर श्रीमती रजनी ताई जोगळेकर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमानंतर उपस्थितांना भोजन देण्यात आले.

