shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी


प्रतिनिधी : सुर्यकांत होनप

करमाळा : १४ /  बुधभूषण फाउंडेशन च्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती साजरी करण्यात आली .

यावेळी जयंतीच्या निमित्ताने छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला बार्शी येथे निवासी नायब तहसीलदार माजिद भाई काझी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून फाउंडेशन चे मार्गदर्शक पत्रकार अलीम शेख उपस्थित होते .

छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेतून बुधभूषण फाउंडेशन ची स्थापना झाली असल्याची माहिती फाउंडेशन चे चेअरमन अमोल दुरंदे यांनी दिली.

छत्रपती संभाजी महाराज यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी संस्कृत मध्ये बुधभूषण हा  ग्रंथ लिहिला .छत्रपती संभाजी महाराज हे पराक्रमी व धुरंधर व्यक्तिमत्व होते.छत्रपती संभाजी महाराज यांचा बुधभूषण हा ग्रंथ  इतिहासकारातला मानबिंदू आहे. अशा या शूर व्यक्तीची जयंती आज बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहाने  साजरी करण्यात आली .

या कार्यक्रमास फाउंडेशन चे व्हा . चेअरमन दुर्गेश राठोड सदस्य संदीप चुंग , अर्जुन माने , विलास क्षीरसागर, सुशील कत्रेला आदि मान्यवर उपस्थित होते.
close