shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर - हजरत काजीबाबा यांच्या उरुसास १६ पासून प्रारंभ..!!


--------------------------------

आ.लहु कानडे, उपनगराध्यक्ष ससाणे यांच्या उपस्थितीत सलग दोन दिवस नामवंत कव्वाल्यांचा कार्यक्रम.

_________

श्रीरामपूर  (शौकतभाई शेख) -  अहमदनगर जिल्ह्यात नामवंत कव्वाल्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीरामपूर येथील हजरत काजी शाह बाबा यांच्या उरुसास सोमवार दि. १६ मे २०२२ पासून प्रारंभ होत असल्याची माहिती श्रीरामपूर नगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक तथा उरूस कमेटीचे प्रमुख संयोजक हाजी मुजफ्फरभाई शेख,फतेह ग्रुपचे अध्यक्ष दानिश शेख व उरुस कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक दिलीप नागरे यांनी  दिली.




यासंदर्भात अधिक माहिती अशी की, सोमवार दि.१६ ते बुधवार दि. १८ मे २०२२ असा सलग ३ दिवस उरुसासनिमित संदल आणि कव्वाल्यांचा उत्सव चालणार आहे.

सोमवार दि. १६ मे २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता पै.पापा जलालभाई शेख यांच्या निवासस्थानासमोरून संदल कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. मंगळवार दि. १७ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता जगप्रसिद्ध कव्वाल अझीम नाजा यांचा तर मंगळवार दि. १७ मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता वसीम साबरी व करिष्मा ताज यांचा  कवाल्याचा  बहारदार कार्यक्रम प्रभाग ९ मधील  मुळा प्रवरा वीज संस्थेचे माजी संचालक आणि श्रीरामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक शहीद आयुबभाई शेख फतेह चौकातील उरूस मैदानावर होणार आहे.

उरूस यशस्वीतेसाठी फतेह यंग सर्कल, सरकार ग्रुप, अल्बा ग्रुप, सुभेदार सोशल ग्रुप, अल्नुर युथ फौंडेशन, के.जी. एन. ग्रुप, एकता यंग सर्कल, संजेरी फ्रेंड ग्रुप, मौलाना आझाद युथ फौंडेशन, एस.के. ग्रुप, गरीब नवाज फौंडेशन, अल्कुरेश ग्रुप आदि प्रयत्न शील आहेत. 

 उरूस निमित्त आयोजीत कव्वाल्यांचा भक्तांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एजाज इनामदार, दिलीप नागरे, लाल पटेल, हाजी अलाउदीन सैदुभाई, हाजी राज मोहमद रुस्तुमभाई, बाबा इनामदार, पत्रकार असलम बिनसाद, शफीक बागवान, बरकतअली शेख, मेहबूब कुरेशी, जयेश सावंत, अल्ताफ शेख, हमीद पटेल, गफार पोपटीया, राजू मिर्झा, फिरोज मुलांनी, सलीम टर्नर, हाजी मतीन शेख, जाकीर जहागीरदार, रशीद पांडे, दिनमोहमद शेख, समीर खान, शाहिद कुरेशी, मुख्तार काझी, इरफान जीवानी, अजय कदम, मनोज गुप्ता, सागर घोरपडे,  पप्पू खान, विकी शर्मा, अगस्ती त्रिभुवन, आशिक आली, नाजीम पिरजादे आदींनी केले आहे.

close