shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पाथर्डीचे तहसीलदार अडकले लग्नाच्या बेडीत ; राहुरी येथे झाला विवाह संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 शुक्रवार दिनांक २७ मे २०२२

पाथर्डीचे तहसीलदार अडकले लग्नाच्या बेडीत ; राहुरी येथे झाला विवाह संपन्न..!!


अहमदनगर : दुष्काळी पाथर्डी तालुक्याच्या डोंगराळ भागात उत्कृष्ट तहसीलदार म्हणून सेवा उपलब्ध करुन देण्यात तरबेज असलेले पाथर्डीचे तहसीलदार शाम वाडकर हे लग्नाच्या बेडीत अडकले आहेत.

     वांबोरी येथील सौ.चंद्रकला व श्री बाळासाहेब शंकर वाडकर यांचे सुपुत्र तहसीलदार शाम आणि राहुरी येथील सौ.संजिवनी व श्री सुरेश धोंडिराम तनपुरे यांची कन्या चि.सौ.कां. ऋचा यांचा शुभविवाह राहुरी येथील स्टेशन रोडवरील वरील व्यंकटेश मंगल कार्यालयात मोठ्या थाटात संपन्न झाला.
      या विवाह सोहळ्यासाठी, शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे, पाथर्डी पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू पंत अकोलकर, भारत मतकर, तिसगावातील सोन्याचे प्रसिद्ध व्यापारी बेंद्रेसराफ,पाथर्डीच्या तहसील कार्यालयातील मुख्य कर्मचारी सदानंद बारसे यांच्या नेतृत्वाखालील सर्व तहसील कर्मचारी आणि संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यातील धार्मिक, सामाजिक,शैक्षणिक, राजकीय,क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close