shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फ्रेंचाईजीच्या नावाखाली अनेकांची लाखोंची फसवणूक..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                  शुक्रवार दिनांक २७ मे २०२२

फ्रेंचाईजीच्या नावाखाली अनेकांची लाखोंची फसवणूक..!!
 
अहमदनगर  : किराणा व्यवसायाकरिता फ्रेंचाईजीच्या नावाखाली अनेकांची लाखोंनी फसवणूक झाल्याची फिर्याद तोफखाना पोलिस ठाण्यात दि. २० रोजी दाखल करण्यात आली असून, १९ जणांना ६८ लाख ४१ हजारांनी तिघांनी मिळून गंडविल्याची तक्रार कुणाल भगत ( रा. बुऱ्हाणनगर, ता.जि.नगर ) यांनी दिली आहे.

कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर आल्यानंतर मोठ्या प्रमाणात फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यामध्ये कमी पैसे गुंतवून जास्त पैसे मिळवण्याच्या, तसेच कंपन्यांच्या फ्रेंचाईजी देण्याच्या नावाखाली लाखोंनी गंडविल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तशीच एक घटना नगर तालुक्यात घडली आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्यात फसवणूक झाल्याची तक्रार कुणाल भगत यांनी दिली असून, किराणा माल फ्रँचाईजीच्या नावाखाली १९ जणांना तिघांनी मिळून ६८ लाखाला गंडविले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोशल मीडियावर ग्रोसरी मार्केट व रिटेल ग्रोसरी मार्केटसाठी बी.के. ब्रँडसाठी फ्रँचाईजीसाठी एक जाहिरात प्रसिध्द करण्यात आली. जाहिरात वाचून फ्रेंचाईजी देणाऱ्या त्या व्यक्तीकडून व्यवसायासंबंधित सखोल माहिती घेवून व्यवसायात पैसे गुंतविण्याचा निर्णय फिर्यादीने घेतला.
२३ ऑक्टोबर २०२० रोजी करारनामा करून आठ लाख ६० हजार आरटीजीएस व एक लाख ४० हजार रोख तक्रारदारांनी दिले. त्यानंतर करारनाम्यानुसार भिस्तबाग चौक, सावेडी रोड येथे फिर्यादीने दुकान सुरू केले. तीन महिने दुकान चालविल्यानंर ३५ हजारप्रमाणे नफा मिळाल्यानंतर कोरोनामुळे काही महिने दुकान बंद राहिले. यानंतर त्या फसवणूक केलेल्या दोघांनी पैसे देणे बंद केले. आप सी समझोता करण्याचे ठरल्यानंतर आयडीएफसी बँकेचे तीन चेक दिले; मात्र तिन्ही चेक अंकाउंटला वटले नसल्याने व नवनागापूर येथे असलेल्या ऑफिसला गेल्यानंतर ऑफिस बंद आढळल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close