पुणे- धनलक्ष्मी स्वयंम सायता महिला बचत गटास राजमाता जिजाऊ महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, शाल, प्रसस्तीपत्रक असे होते. ग्रीन फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष श्री. अमित जगताप, जेष्ठ साहित्यीक दिग्दर्शक, प्राध्यापक एल. बी. पाटील, सेल्स ऑफीसर श्री .सुहास पाटील, पी एस आय महादेव जाधव, संपर्क बालग्राम चे अधिक्षक वैभव कुंभार, ग्रीन फाउंडेशन सदस्य संजय कुलुत, विशाल लष्कर आदि मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
अलिबाग तालुक्यातील छोटयाशा ग्रामीण भागातील भाकरवड येथील धनलक्ष्मी स्वयंम सायता महिला बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन महिला सबलीकरण आर्थिक, सामाजिक, तसेच व्यवहारिक दृष्टया सशक्त होताना दिसत आहेत याचे सर्व श्रेय जाते. झेप फाउंडेशन च्या अध्यक्ष चित्रा ताई पाटील यांना चूल व मुलं सांभाळणाच्या महिलाना एक स्टेज तयार करून आपल्या संघटनेच्या माध्यमातून त्यांना बाहेर काढून विविध योजनांची माहिती देत सहभागी करण्याचे मोलाचे कार्य त्या करीत आहेत त्यांना नॅशनल मंडेला नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. तर हे बचत गट ग्रामपंचायत पोयनाड, पंचायत समिती अलिबाग यांना रजिस्ट्रेशन केलेले आहे.
सण 2007 साली सुशिक्षित बेरोजगार महिला एकत्र येऊन प्रथम17 किलो चकली पीठ तयार केला यासाठी मार्केट मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला टप्प्याटप्प्यात पापड, लोणचे, मिरची पावडर तसेच वेगवेगळ्या प्रकारचे गरममसाले, फराळ तयार करून ते बाजारात, गावागावात स्वस्त व माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध करून त्यांमध्ये होणाऱ्या नफ्यात आपल्या परिवारास एक जोड धंदा तयार केला यावेळी पोयनाड ग्रामपंचायत हद्दीत पोयनाड दीपावलीच्या दरम्यान नाक्यावर तयार चकली आणारसे व पीठ सरपंच शकुंतला काकडे यांच्या माध्यमातून दुकान लावण्यास परवानगी घेऊन तिथे ही उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला
त्या नंतर हे बचत गट नावारूपाला आले आपल्या पंधरा सदस्य असलेल्या या गटात प्रत्येक सभासद दर महिन्याच्या अखेरीस काही पैसे काढतात त्याचा उपयोग आपल्या सभासदास कोणत्याही प्रकारची अडचण आली तर ते पैसे एकमेकांना व्याजी स्वरूपात दिले जातात याच जमलेल्या पैशातून छोटे मोठे उद्योग करतात मग पापड, चकली पीठ, अनारसे पीठ व अनारसे चकली तयार करून यावर्षी बैंक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, स्टेट बैंक (एस बी आय) आदीने लावलेल्या महिलांच्या प्रशिक्षण केंद्रात आपले दिवाळीच्या फराळाचे स्टॉल लावून एक चांगला प्रतिसाद मिळाला यावेळी 2000 किलो अनारसे व चकली पीठ मार्केटिंग करून चांगला प्रॉफिट मिळवला या बचत गटांत उर्मिला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उपाध्यक्ष रुपाली पाटील सचिव जयश्री पाटील तर सभासद वैजयंती पाटील, सुवर्णा पाटील, मा पाटील, नितिषा पाटील, पुष्पा पाटील, प्रीतम पाटील, मंदा पाटील, स्नेहल पाटील, ज्योती पाटील, प्रियांका पाटील, आरती पाटील, असे एकूण पंधरा सभासद आहेत यांच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने राजमाता जिजाऊ महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

