shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

यंदा भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवास परवानगी, धिंगाणा घातल्यास होनार कारवाई..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 बुधवार दिनांक ११ मे २०२२

यंदा भंडारदरा परिसरात काजवा महोत्सवास परवानगी, धिंगाणा घातल्यास होनार कारवाई..!!

भंडारदरा : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने वन विभागाने भंडारदरा- कळसूबाई अभयारण्यात पर्यटकांना १५ मे ते २५ जुलैपर्यंत पर्यटकांना लखलखणाऱ्या काजव्यांचा निसर्गाविष्कार पाहण्याची संधी दिली आहे तब्बल दोन वर्षांनी मिळणार आहे. दर वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या व जून महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात भंडारदरा- कळसूबाई अभयारण्याच्या परिसरात काजवा महोत्सवाचे आयोजन केले जाते. पावसाळ्याची चाहूल लागताच अंधारातील काजव्यांची लखलखती दुनिया अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या दिशेने वळतात. दिग्रस बायपास आर्णी रस्त्याचे काम रद्द झाल्याची अफवा आता राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. तर राज्य शासनाने सर्व निर्बंधही उठवले आहेत. 
दोन वर्षांपासून वन विभागालाही पर्यटकांच्या प्रवेशशुल्कातून मिळणारे उत्पन्न मिळणे बंद झाले होते. यामुळे आदिवासींचा रोजगारही बुडत होता. मात्र यंदा काजवा महोत्सव होनार असुन पर्यटकांना रात्री ९.०० वाजे पर्यंत प्रवेश मिळणार असुन १०.३० पर्यंत बाहेर पडता येईना आहे या मुळे साडेतीनशे आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. अभयारण्यात मद्यपान करून धिंगाणा घातल्यास त्याच्यावर रितसर व कडक कारवाई केली जाईल असा इशारा वन विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी दिला. तर भंडारदरा हद्दितुन प्रवेश करताना पर्यटकांनी वन विभागाने ठरवुन दिलेले शुल्क भरुनच प्रवेश करवे कोणत्याही नेता व पुठारी यांची ओळख सांगत त्याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालु नये असे आढळुन आल्यास त्याला जस्यास तसे उत्तर दिले जाईल याची काळजी घ्यावी - पांडुरंग खाडे (सरपंच भंडारदरा)

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close