shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बुधभूषण फाउंडेशनच्या वतीने महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे वाटप..


प्रतिनिधी : सूर्यकांत होनप

करमाळा: ३१ / सन २०२२ मध्ये राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाद्वारे सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची जयंतीचा कार्यक्रम दिनांक २ जून २०२२ ला करण्याबाबत आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या गेल्या आहेत.

 त्या अनुषंगाने करमाळा परिसरातील सर्व शासकीय कार्यालयांना बुधभूषण फाउंडेशन तर्फे महाराणा प्रतापसिंह यांची प्रतिमा भेट देण्यात आली. तहसील कार्यालय करमाळा येथे विशाल राठोड यांच्या हस्ते नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांचेकडे महाराणा प्रताप सिंह यांची प्रतिमा सुपूर्द करण्यात आली.

 त्याचप्रमाणे करमाळा पोलीस स्टेशन, पंचायत समिती, भूमिअभिलेख कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका आणि कुटीर रुग्णालय येथे ,राजूशेठ जव्हेरी, अमोल परदेशी,आलिंम शेख,संदीप चुंग, विशाल परदेशी, हनुमानसिंह राजपूत आणि झनकसिंह परदेशी,फाउंडेशन चे व्हा चेअरमन दुर्गेश राठोड यांच्या हस्ते प्रतिमा देण्यात आल्या.

   यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी सांगितले की, सामान्य प्रशासन विभागातर्फे राष्ट्रपुरुषांच्या जयंती साजरी करण्याबाबत सूचना आलेल्या आहेत. त्यानुसार तहसील कार्यालयात प्रत्येक महापुरुषाची जयंती नियमित साजरी केली जाते.

      बुधभूषण फाउंडेशन चे  चेअरमन अमोल दुरंदे यांनी सांगितले की, शासकीय कार्यालयात जयंती साजरी करणे बाबत सूचना आल्या असल्या तरी प्रत्येक कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांची प्रतिमा सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही प्रतिमा भेट देण्याचे नियोजन केले.
    यावेळी विश्वजीत परदेशी,  मंगल सिंह राजपूत, नरसिंह परदेशी ,अक्षय परदेशी,नितीन परदेशी आदि मान्यवर उपस्थित होते.
close