shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरीवादळी वारे व झाडे उन्मळून पडले.!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 बुधवार दिनांक १ जुन २०२२

पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी
वादळी वारे व झाडे उन्मळून पडले.!!


पारनेर : मंगळवारी दुपारी पारनेर तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांना अवकाळी पाऊस , शेतीच्या मशागतीसाठी फायदेशीर झाला. मे महिना संपत आला तरी उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. मंगळवारी दिवसभर मोठ्या प्रमाणात उष्णता होती साधारणपणे दुपारनंतर ढगाची जमवाजमव होऊन तिसर्‍या प्रहार नंतर तालुक्यातील राळेगण थेरपाळ , निघोज , जवळा , सांगवी सुर्या , गांजी भोयरे व लगतच्या गावात पावसाला सुरूवात झाली. यावेळी मोठ्या प्रमाणात वादळी वारे वाहत होते. यावेळी सांगवी सुर्या, गांजीभोयरे व राळेगण थेरपाळ या गावांत चांगल्या प्रमाणात पाऊस झाला तर काही गावानत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर राळेगण थेरपाळ येथे काही ठिकाणी झाडे मोडण्याचे प्रकारही घडले आहेत.
मोसमी पाऊस हा वादळी वार्‍यासह होत असला तरी शेतीसाठी मोठ्या फायद्याचा आहे. सध्या शेतातील पिकांना पाण्याचा तुटवडा जाणवत आहे. आशा वेळी हा आवकाळी पाऊस त्या पिकांना जिवदान ठरत आहे. तर या पावसाने शेतातील ढेकळ फुटुन शेती मशागातीसाठी मोठा फलदायी ठरत आहे. कारण या अवकाळी पावसानंतर बळीराजा खरीप हंगामाच्या तयारीला लागत आसतो. आज ज्या गावात पाऊस झाला तेथील शेतकरी उद्यापासुन शेतीमशागतीच्या तयारीला लागणार.

उकाड्यानी हैराण झालेल्या नागरिकांना या अवकाळी पावसामुळे थोडा दिलासा मिळणार आहे. तर वेळेवर पाऊस सुरु झाल्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या पिक पाण्याचे चांगले नियोजन करता येणार आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने बळीराजा सुखावला असुन असेच अजुन दोन चार पाऊस झाले तर मुग, बाजरी, सोयाबीनच्या पेरणीची तयारी करता येईल.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


 

close