shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राहुरी तालुक्यातील कुंटणखान्यावर छापा ; एका महिलेवर गुन्हा दाखल; तीन पिडितांची सुटका..!!

राहुरी तालुक्यातील कुंटणखान्यावर छापा ; एका महिलेवर गुन्हा दाखल; तीन पिडितांची सुटका-डी वाय एस पी संदिप मिटके आणि पोलिस निरिक्षक प्रताप दराडे यांची करवाई..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                        बुधवार दिनांक ११ मे २०२२

राहुरी :  बनावट ग्राहक पाठवून गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील घरातच असलेल्या कुंटणखान्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. ही घटना सोमवार दि. 9 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुहा शिवारात घडली. याप्रकरणी कुंटणखाना चालक महिलेवर राहुरी पोलीस ठाण्यात पिटांतर्गत गुरनं व कलम -॥ 388/2022 या व मुली यांचे व्यापारास ( प्रतिबंध ) कायदा 1958 चे कलम 3, 4, 5, 7, 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. यावेळी संबंधित महिलांचे मोबाईल हस्तगत करण्यात आले असून अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, गुहा गावात भर मध्यवस्तीत हा व्यवसाय सुरू होता व त्याची माहिती गावातील नागरिकांना नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

राहुरी तालुक्यातील गुहा येथील एक महिला आरोपी पीडित महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन त्या ठिकाणी छापा मारला असता तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. तर एका महिला आरोपीविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात पिटाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन गुहा येथे बनावट ग्राहक पाठवून पंचासमक्ष छापा टाकला. एका महिला आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात प्रचलीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close