shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बेकायदेशीर मांगूर उत्पादन करणारांची ग्रामस्थांना दादागिरी

मांगुर मासे उत्पादनाला शासनाची आहे बंदी

प्रतिनिधी:  सुर्यकांत होनप

इंदापूर: दि. ११ / इंदापूर तालुक्यातील कालठण नं. 1.  येथील बेकायदेशीर मांगुर उत्पादन करणारे लोक नागरिकांना दमबाजी करत आहेत. शिर्डी एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनंतर प्रशासनाने दखल घेतली होती. तरीही कालठण येथे  शासनाची बंदी असलेल्या मांगुर माशाचे उत्पादन राजरोसपणे सुरू आहे. त्याबाबत सामाजिक कार्यकर्ते गोविंद पाडुळे यांनी यापूर्वी आवाज उठवला होता.

दिनांक 8/5/22 रोजी  मांगुर माशांसाठी खाद्य म्हणून वापरले जाणारे वेस्टेज (जनावरांचे मांस) गावांतील  रस्त्यावर पडलेले सकाळी आढळून आले. याबाबत आवाज उठवला म्हणून  बेकायदेशीर मांगुर उत्पादन करणाऱ्यांनी गोविंद पाडुळे यांच्या घरी येऊन अरेरावीची भाषा वापरून दमबाजी केली. आम्ही रस्त्यावरच घाण टाकणार तुला काय करायचे? आमचे कोणी काहीही करू शकत नाही. तसेच तुमच्यामध्ये दम असेल तर मांगुर  बंद करून दाखवा अशी भाषा वापरली. याबाबत पाडुळे  यांनी दोघाजणांची पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पाडुळे हे कालठण  विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे संचालक आहेत त्यामुळे  बेकायदेशीर मांगुर उत्पादन करणारे लोकप्रतिनिधींना दादागिरी करत असतील तर सामान्य नागरिकांची काय अवस्था असा पाडुळे यांनी प्रश्न उपस्थित केला. मांगुर मुळे व वेस्टेज मुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. पाणी प्रदूषण होऊन रोगराई पसरण्याची शक्यता आहे. वेस्टेज मुळे भटके कुत्र्यांची संख्या वाढलेली असून शेतकऱ्यांना व गुराढोरांना धोका उत्पन्न झालेला आहे. ग्रामपंचायत या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.

पाडुळे  यांनी यापूर्वी कालठण ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचारावर आवाज उठवून त्याबाबत तक्रार दाखल केलेली असल्यामुळे आणि  सरपंचांचे पती व नातेवाईक बेकायदेशीर मांगुर व्यवसायामध्ये हितसंबंध जोपासत असल्यामुळे या प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का याचीही पडताळणी करावी असे पोलिसांना विनंती केली आहे. तसेच लवकरच बेकायदेशीर मांगुर उत्पादन बंद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
close